एकसारखे दिसतात, पण एकसारखे नाही दोन्ही चित्र; जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील ३ फरक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:56 IST2026-04-02T16:41:35+5:302026-04-02T16:56:46+5:30
Spot the difference puzzle : एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये आपल्याला ३ फरक शोधायचे आहेत.

एकसारखे दिसतात, पण एकसारखे नाही दोन्ही चित्र; जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील ३ फरक
Spot the difference puzzle : फाइंड द डिफरन्सेस पझल्स सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कारण हे पझल्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच मनोरंजन करतात. आपणही अनेकदा असे पझल्स सॉल्व केले असतील. आपल्या त्यातील फरक कधी लवकर दिसले असतील तर कधी उशिरा दिसले असतील. ते काही असो पण अशा पझल्समुळे टाइम पास चांगला होतो. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये आपल्याला ३ फरक शोधायचे आहेत.
आपल्यासमोर असलेल्या फोटोत एकसारखी दिसणारी दोन चित्रे दाखवण्यात आली आहेत. ज्यात एका टेबलवर चहाची कीटली, कप, अॅपल, प्लेटमध्ये स्ट्रॉबेरी ठेवलेली दिसते. मागे बंद असलेली खिडकी आणि पडदे दिसत आहेत. पहिल्या नजरेत सगळ्याच गोष्टी सारख्याच वाटतात. पण मुळात त्या सारख्या नाहीत. त्यांमध्ये ३ फरक आहेत. जे आपल्याला ३० सेकंदात शोधायचे आहेत. जर आपण बारकाईने फोटो पाहिला तर आपल्याला नक्कीच यातील ३ फरक दिसून येतील.

आपल्याला माहीत असेल की, अशाप्रकारे पझल्स किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यात लपवलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या मेहनतीने शोधाव्या लागतात. पण हे काही सोपं काम नसतं. या फोटोंची खासियत म्हणजे या फोटोतून मेंदूची आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. त्यामुळेच हे फोटो खूप व्हायरल होत असतात.

आशा आहे की, आपल्याला ३० सेकंदात दोन्ही फोटोतील ३ फरक दिसले असतील. जर दिसले असतील तर आपलं अभिनंदन. पण जर दिसले नसतील तर निराश होऊ नका. एकदा पुन्हा फोटो बारकाईने बघा आणि फरक शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही दिसले नाहीत तर खालच्या फोटोत ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत ३ फरक सर्कल केलेले आहेत.