दोन्ही पाय नसलेल्या अवघ्या १० वर्षाच्या या चिमुकलीचे कर्तब पाहुन तुम्ही तोंडात बोटे घालाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 15:26 IST2021-10-28T15:22:24+5:302021-10-28T15:26:47+5:30
एका लहान आणि धाडसी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. जिचं तुम्ही नक्कीच कौतुक कराल. व्हिडिओमध्ये पाय नसलेली मुलगी जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. यासोबतच मुलगी पुश-अप्स करतानाही दिसत आहे.

दोन्ही पाय नसलेल्या अवघ्या १० वर्षाच्या या चिमुकलीचे कर्तब पाहुन तुम्ही तोंडात बोटे घालाल...
जगातील काही लोक प्रत्येक छोट्या गोष्टीवर नशिबाला दोष देत असतात. आपल्यासोबतच असं वाईट का घडते, अशी अनेकांची तक्रार असते. पण काही लोक असे असतात जे सर्व त्रास सहन करूनही कोणतीही तक्रार न करता आयुष्य जगतात. अशी माणसे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोतही बनतात. सध्या अशाच एका लहान आणि धाडसी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. जिचं तुम्ही नक्कीच कौतुक कराल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाय नसलेली मुलगी जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेताना दिसत आहे. यासोबतच मुलगी पुश-अप्स करतानाही दिसत आहे. दोन्ही पायांशिवाय असे अवघड प्रशिक्षण घेणे अजिबात सोपे नाही. पण या मुलीने दाखवून दिले की, अपंगत्व तिच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण मुलीला प्रोत्साहन देत आहेत.
10-year-old Paige Calendine of Ohio is a force!🌟🏅🏆.
— GoodNewsCorrespondent (@GoodNewsCorres1) October 25, 2021
(🎥:heidi.calendine)💪😃💪
pic.twitter.com/DI23hHRO4r
हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी वेगाने आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका युजरने लिहिले की, जिम्नॅस्टिक ही सर्वात कठीण स्पर्धा आहे. विशेषत: पाय नसलेली व्यक्ती असा कठोर सराव करताना पाहणे आश्चर्यकारक आहे. त्याचवेळी, आणखी एका युजरने लिहिले की, मला वाटते की मुलीच्या हिंमतीला कुणीही हरवू शकत नाही.
आता हा व्हिडीओ इंटरनेट विश्वात चांगलाच लाईक केला जात आहे. GoodNewsCorrespondent नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लिहिपर्यंत हा व्हिडिओ 25 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.