Sonu Sood आणि Khaby Lame मध्ये ऑन कॅमेरा 'तूतू-मैंमैं', पाहा मजेशीर Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:31 IST2022-12-15T16:30:45+5:302022-12-15T16:31:00+5:30
Sonu Sood Khaby Lame: अभिनेता सोनू सूद आणि सोशल मीडिया स्टार खाबी लेमचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

Sonu Sood आणि Khaby Lame मध्ये ऑन कॅमेरा 'तूतू-मैंमैं', पाहा मजेशीर Video...
Khaby Lame Viral Video: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ने सोशल मीडिया स्टार आणि इंफ्लुएंसर खाबी लेम (Khaby Lame) सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ज्यूस पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रॉसाठी दोघांमध्ये 'तूतू-मैंमैं' झालेली पाहायला मिळत आहे.
सोनू सूदचा व्हिडिओ व्हायरल...
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनू सूद आणि खाबी लेम सोफ्यावर बसले आहेत आणि समोर बर्फाने भरलेले दोन ग्लास आहेत. यावेळी सोनी आपल्या हाताने खाबेच्या ग्लासमध्ये ज्यूस भरतो. सर्व ज्यूस खाबीच्या ग्लासमध्ये जातो आणि सोनूसाठी अतिशय थोडा ज्यूस उरतो. यावेळी खाबी सोनूच्या ग्लासकडे हात पुढे करतो, सोनूला वाटते की, खाबी ग्लास बदली करतोय.
सोनू खाबीला ग्लास घेऊ देत नाही, काही सेकंदानंतर खाबी अचाक त्याच्या ग्लासमधली स्ट्रॉ काढून घेतो. अखेर सोनूला समजते की, ही तुतू-मैंमैं ग्लाससाठी नाही, तर स्ट्रॉसाठी सुरू होती. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 46 लाख वेळा पाहिला गेला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.