दारुच्या नशेत आईच्या अस्थी हरवल्या; आता शोधण्यासाठी वणवण भटकतोय मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 03:31 PM2021-09-29T15:31:59+5:302021-09-29T15:33:01+5:30

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारा ३९ वर्षीय पॉल गेल यांच्या आई पामेला सिल्विया गेलचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता.

Son lost mothers ashes at bar man went to drink liquor with mother ashes in pub | दारुच्या नशेत आईच्या अस्थी हरवल्या; आता शोधण्यासाठी वणवण भटकतोय मुलगा

दारुच्या नशेत आईच्या अस्थी हरवल्या; आता शोधण्यासाठी वणवण भटकतोय मुलगा

Next
ठळक मुद्देकाही ड्रिंक्सनंतर पॉलची प्रेयसी तिच्या घरी परतली पण पॉल नशेच्या धुंदींत तिथेच झोपी गेला.बार बंद करतेवेळी तेथील कर्मचाऱ्यांनी पॉलला उठवलं. त्यानंतर पॉल नशेच्या अवस्थेतच घरी गेला.आईच्या अस्थी हरवल्या आहेत. त्यानंतर तो अस्थीचा शोध घेऊ लागला. परंतु त्याच्या हाती निराशा पडली.

दारुच्या नशेत एका व्यक्तीने स्वत:च्या आईच्या अस्थी हरवल्या आहेत आता त्याचा शोध घेण्यासाठी लोकांकडे मदतीची विनंती केली आहे. आईच्या अस्थी घेऊन एका बारमध्ये युवक प्रेयसीसोबत बसला होता. याठिकाणी दोघांनी ड्रिंक केली. परंतु ड्रिंकनंतर युवकाला इतकी नशा झाली की त्याने त्याच्याजवळ असलेल्या आईच्या अस्थी हरवल्या. युवकाने ही घटना सोशल मीडियात सविस्तर शेअर करत लोकांकडे मदतीसाठी विनंती केली आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारा ३९ वर्षीय पॉल गेल यांच्या आई पामेला सिल्विया गेलचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. तो आईच्या अस्थी घेऊन प्रेयसीसोबत निघाला होता. दोघंही रस्त्यात एका बारमध्ये बसले. ज्याठिकाणी प्रियकर-प्रेयसीनं ड्रिंक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही ड्रिंक्सनंतर पॉलची प्रेयसी तिच्या घरी परतली पण पॉल नशेच्या धुंदींत तिथेच झोपी गेला. बार बंद करतेवेळी तेथील कर्मचाऱ्यांनी पॉलला उठवलं. त्यानंतर पॉल नशेच्या अवस्थेतच घरी गेला.

दुसऱ्या दिवशी जेव्हा पॉलचे डोळे उघडले तेव्हा त्याला माहिती पडलं की, आईच्या अस्थी हरवल्या आहेत. त्यानंतर तो अस्थीचा शोध घेऊ लागला. परंतु त्याच्या हाती निराशा पडली. त्यानंतर पॉलने लोकांना मदत मागत कुणालाही त्याच्या आई पामेलाच्या अस्थी सापडल्या तर तात्काळ मला संपर्क करा असं आवाहन केले आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पॉलचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सिक्युरिटी गार्डच्या नोकरीमुळे आईच्या अस्थी जमा करण्यास त्याला विलंब झाल्याचं तो म्हणाला.

कसंतरी करून त्याने २२ सप्टेंबरला आईच्या अस्थी गोळा केल्या. त्यावेळी पॉलची प्रेयसीही त्याच्यासोबत होती. रस्त्यात जेव्हा त्याने बार पाहिलं तेव्हा दोघंही ड्रिंक करायला तिथे गेले. परंतु बारमध्ये पॉलने इतकी दारू प्यायली की त्याने आईच्या अस्थी कुठे ठेवल्या हेच त्याच्या डोक्यातून गेले. आता सोशल मीडियात आईच्या अस्थीचा फोटो शेअर करत पॉलने लोकांना त्या अस्थींचा शोध घेण्यासाठी मदत करा असं आवाहन करत स्वत:ही आईच्या अस्थीचा शोध घेण्यासाठी दारोदारी भटकत आहे.

Web Title: Son lost mothers ashes at bar man went to drink liquor with mother ashes in pub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.