शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांनी हिरावली शेजाऱ्यांची शांतता, आईला 27,000 रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 17:11 IST

मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांमुळे मुलाच्या आईला दंड भरावा लागला.

नवी दिल्ली : अनेक लोकांचा असा समज असतो की ते त्यांच्या खासगी घरात, त्यांच्या बेडरूममध्ये काहीही करू शकतात आणि त्यामुळे कोणाला काही फरक पडत नाही. काही प्रमाणात ते ठीक देखील आहे, मात्र तुम्ही केलेल्या कामामुळे इतरांना त्रासही होऊ शकतो. त्यामुळे चार भिंतींच्या आत केलेल्या कृतीकडे अधिक लक्ष देण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण असे न केल्यास अडचणी वाढू शकतात. असाच एक प्रकार वेल्समधील एका महिलेच्या बाबतीत घडला आहे. 

दरम्यान, मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडने शेजाऱ्यांची (Woman fine 27000 rupees due to son and her girlfriend) शांतता हिरावल्याप्रकरणी त्या शेजाऱ्यांनी खटला दाखल केला. शेजाऱ्यांनी संबंधित मुलाच्या आईविरोधात दाखल केलेल्या खटल्यामुळे मुलाच्या आईला तब्बल 27,000 रूपयांचा दंड भरावा लागला. खरं तर वेल्सची रहिवासी असलेल्या 41 वर्षीय क्रिस्टिन मॉर्गन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांच्या शेजाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की जोडप्याच्या रोमँटिक आवाजामुळे शेजाऱ्यांना त्रास होतो. ज्यामुळे त्यांच्या घरातील झोप आणि शांतता हिरावून घेतली जाते. शेजाऱ्यांनी अनेकवेळा लव्ह मेकिंगच्या (Couple romantic noise disturb neighbours) आवाजाची तक्रार केली असता प्रशासनाने हा प्रकार लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.

मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडमुळे आईला भरावा लागला दंडक्रिस्टीन या त्यांचे वृद्ध वडील, 23 ​​वर्षांचा मुलगा आणि 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत राहतात. रेक्सहॅम काउंटी बुरो काउन्सिलमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली, जिथे कोर्टाने क्रिस्टीन यांना 27 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर क्रिस्टीन यांनी न्यायालयात सांगितले की, त्या आवाजांना त्यांचा मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड जबाबदार आहे. न्यायालयानेही मान्य केले की क्रिस्टीन या नाईट शिफ्ट करतात, त्यामुळे तो आवाज त्यांचा असू शकत नाहीत. परंतु शेजाऱ्यांनी तक्रार केली आहे की आवाज त्यांच्या घरातून आले आहेत जे रोमँटिक क्षणांचे आहेत.

मागील वर्षांच्या डिसेंबरपासून वाढला होता आवाजशेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, या आवाजामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. मध्यरात्री आवाज मोठ्या प्रमाणात येतो. सर्वप्रथम जुलै 2020 मध्ये असा आवाज आला होता, जेव्हा क्रिस्टिन यांच्या घरी मोठ्या आवाजात  पार्टी केली जात होती. त्यानंतर रोमँटिक क्षणांचे आवाज ऐकू यायला लागले. मागील वर्षीच्या ख्रिसमसपासून या आवाजात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. शेजाऱ्यांच्या घराबाहेरील आवाज रेकॉर्ड करण्यासाठी प्रशासनाकडून नॉईज मॉनिटर बसवण्यात आला होता, ज्यावरून हा आवाज संभोग करताना असल्याचा आढळून आला. आवाजामुळे शेजाऱ्यांना स्वतःच्या घरात सुखाने राहता येत नाही आणि कधी कधी लाजिरवाणेही व्हावे लागते. म्हणून क्रिस्टीन यांच्या मुलावरही पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत 4 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाCourtन्यायालयSex Lifeलैंगिक जीवन