#KikiChallenge : किकी चॅलेंज पडतयं अनेकांना महागात; अपघातांचे व्हिडीओ झाले व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 11:49 IST2018-08-02T11:48:54+5:302018-08-02T11:49:50+5:30
काही दिवसांपूर्वी 'ब्लू व्हेल' गेमनं संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. या गेममध्ये देण्यात आलेलं चॅलेंज पूर्ण करताना अनेक मुलांनी आपला जीव गमावला होता. आता ब्लू व्हेल चॅलेंजनंतर आणखी एक ट्रेन्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

#KikiChallenge : किकी चॅलेंज पडतयं अनेकांना महागात; अपघातांचे व्हिडीओ झाले व्हायरल!
काही दिवसांपूर्वी 'ब्लू व्हेल' गेमनं संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. या गेममध्ये देण्यात आलेलं चॅलेंज पूर्ण करताना अनेक मुलांनी आपला जीव गमावला होता. आता ब्लू व्हेल चॅलेंजनंतर आणखी एक ट्रेन्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोकं आपल्या चालत्या गाडीतून उतरून रोडवर डान्स करायला सुरुवात करतायत. म्हणजे ती व्यक्ति डान्स करत करत गाडीसोबतच पुढे जाते. 'किकी चॅलेंज' (Kiki Challenge)या नावाने हा ट्रेंन्ड व्हायरल होत आहे. परंतु यामध्ये जीवाला धोका आहे, तरीही अनेक लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. यामध्ये सामान्य लोकं त्याचप्रमाणे बॉलिवूड सेलिब्रिटींही किकी चॅलेंज पूर्ण करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. तसेच हे चॅलेंज करत असताना घडून आलेल्या आपघातांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
किकी चॅलेंज जगभरात व्हायरल होत असून लोकांनी उत्साहाच्या भरात हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी काहीही करायला सुरुवात केली आहे. या चॅलेंजमुळे अनेक जीवघेणे अपघातही घडले असून अनेक देशांमध्ये किकी चॅलेंज बॅन करण्यात आलं आहे. तसेच अनेक देशांनी या विषयाची गांभर्याने दखल घेण्यासही सुरुवात केली आहे. दुबई पोलिसांनी किकी चॅलेंजला वॉर्निंग दिली असून दुबईमध्ये किकी चॅलेंज बॅन करण्यात आले आहे. आबुधाबी पोलिसांनकडून तीन सोशल मीडिया यूजर्सना किकी डान्स करण्यासाठी अटकही केली आहे. सर्वात आधी हे चॅलेंज खास करून अमेरिका, यूरोप, इजिप्त, जॉर्डन आणि यूएईमध्ये व्हायरल होत होतं. यानंतर आता भारतातही या चॅलेंजने धुमाकूळ घातला असून याबाबत पोलिसांनी दखल घेण्यास सुरुवात केली आहे.
बॉलिवूडकरांनी अॅक्सेप्ट केलं किकी चॅलेंज
जगभरात गाजणारं किकी चॅलेंज पूर्ण करण्यास बॉलिवूडकरांनीही सुरुवात केली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी या चॅलेंजमध्ये उतरले असून त्यांनी आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये नोरा फतेही, अभिनेत्री अदा शर्मा आणि रागिनी एमएमएस रिटर्न्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतलेली करिश्मा शर्मा यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
किकीविरोधात पोलिसांकडून जागरूकता मोहीम
किकी चॅलेंजने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला असून भारतीय पोलिसांसाठीही हे चॅलेंज डोकेदुखी ठरले आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावर या चॅलेंजविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून लोकांना या चॅलेंजच्या आहारी न जाण्यासाठी आणि त्याबाबत सावधान राहण्यासाठी सल्ला देण्यात येत आहे. यासाठी मुंबई पोलीस, पंजाब पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी आपल्या ऑफिशअल ट्विटर हॅन्डलवरून ट्विट करून लोकांना याबाबत सावधानता बाळगण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. तसेच ट्विटरवरून #inmysafetyfeelingschallenge हा हॅशटॅग किकी चॅलेंजच्याविरोधात ट्रेन्ड होत आहे.
Not just a risk for you but your act can put life of others at risk too. Desist from public nuisance or face the music ! #DanceYourWayToSafety#InMySafetyFeelingsChallengepic.twitter.com/gY2txdcxWZ
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 26, 2018
काय आहे किकी चॅलेंज?
कॅनडातील सिंगर रॅपर ड्रेक ने 'In My Feelings'नावाचं गाणं शेअर केलं होतं. या गाण्याची पहिली लाईन, किकि, तू माझ्यावर प्रेम करतेस का?, तू रस्त्यात आहेस का? अशी आहे. यानंतर जो व्हायरल ट्रेंन्ड सुरु झाला. त्यामुळे गाणं मागे पडलं असून लोकं किकी डान्सच करू लागले आहेत. सर्वात आधी शिग्गी नावाच्या एका कॉमेडियनने आपल्या 16 लाख फॉलोअर्ससोबत किकी डान्स व्हिडीओ #KikiChallenge असा हॅश टॅग वापरून शेअर केला होता. पण त्या व्हिडीओमध्ये त्याने गाडीतून न उतरताच हा व्हिडीओ तयार केला होता. पण फॅन्सनी त्याच्यापेक्षा दोन पावलं पुढे जाऊन व्हिडीओ शेअर केले.