Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:42 IST2025-04-18T12:36:19+5:302025-04-18T12:42:50+5:30
धावत्या मेट्रोमध्ये एक तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. मेट्रोतील हँडलला लटकून तिने स्टंट करायला सुरुवात केली.

Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
सोशल मीडियावर विविध भन्नाट व्हिडीओ हे नेहमीच व्हायरल होत असतात. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपण प्रसिद्ध व्हावं, काहीतरी हटके करावं, व्ह्यूज मिळावेत यासाठी अनेक जण हवेतसे व्हिडीओ बनवत असतात. हल्ली इन्स्टाग्रामची क्रेझही खूप वाढली आहे. रिल्सच्या नादात लोक वाटेल ते करताना दिसतात. स्टंटच्या नादात ते जीवाचीही पर्वा करत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
धावत्या मेट्रोमध्ये एक तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. मेट्रोतील हँडलला लटकून तिने स्टंट करायला सुरुवात केली. ती जेव्हा हे सर्व करते तेव्हा आजुबाजूचे प्रवासी देखील हैराण होतात. मेट्रोमध्ये नेमकं काय सुरू आहे हे थोड्यावेळासाठी त्यांनाही समजत नाही. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. याधी देखील दिल्ली मेट्रोतील भांडणाचे अजब-गजब व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत.
आता तरुणीने मेट्रोत असा कारनामा करून पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मेट्रात हे सर्व केल्याने तरुणीवर टीकास्त्र सोडलं आहे. तर काहींनी तरुणीचं भरभरून कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रावर jagjot_k143 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.