पोटाची खळगी भरणारा अंध तरुण अन् मित्राची खंबीर साथ; व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:01 IST2025-02-10T15:59:02+5:302025-02-10T16:01:37+5:30
Social Media Viral Video :हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोटाची खळगी भरणारा अंध तरुण अन् मित्राची खंबीर साथ; व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील...
Social Media Viral Video : आजच्या युगात पैशाशिवाय कोणतेही काम शक्य नाही. या जगात प्रत्येकजण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही. त्यामुळे बहुतांश लोकांना पैसे कमवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. काहीजण आपल्या आपल्या शारिरीक व्याधी किंवा अपंगत्वाचे कारण देत भीक मागणे किंवा काम न करण्याचा मार्ग निवडतात. तर, काहीजण यावर मात करत मेहनतीचा मार्ग निवडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक अंध तरुण आपल्या उदरनिर्वाहासाठी आपल्या मित्राच्या मदतीने अंगमेहनत करुन पैसे कमवताना दिसतोय. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा व्हिडिओ माणुसकी, मैत्री अन् धैर्याची एक नवीन व्याख्या सांगतोय! अंध तरुणाच्या प्रत्येक पावलावर त्याचा मित्र त्याला मदतीचा हात देतानाही व्हिडिओ दिसतो.
व्हिडिओ पहा
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण एका ट्रकवर संत्री भरताना दिसतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यापैकी एक आंधळा असून, त्याचा साथीदार त्याला पूर्णपणे मदत करताना दिसतो. आंधळा तरुण स्वतःचा भार उचलतो अन् त्याचा मित्र त्याला फक्त रस्ता दाखवतो. हा भावनिक व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ शौकत_31 नावाच्या अकाऊंटने इन्स्टावर शेअर केला आहे. 11 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले असून, अनेकजण यावर विविध कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, वास्तवात जीवन जगणे सोपे नाही. दुसऱ्याने लिहिले की, असे लोकच भविष्यात यशस्वी होतात.