धबधब्याजवळ सेल्फी टिपत होती इन्स्टाग्राम स्टार, पाय घसरला अन् घडली धक्कादायक घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 14:09 IST2021-07-15T14:08:26+5:302021-07-15T14:09:43+5:30
सोशल मीडियावर फेमस होण्याचं वेड हे अगदी जीवघेणं ठरू शकतं. सोशल मीडियात लाइक्स आणि शेअरच्या जंजाळात अडकेली तरुणाई काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाहीत.

धबधब्याजवळ सेल्फी टिपत होती इन्स्टाग्राम स्टार, पाय घसरला अन् घडली धक्कादायक घटना!
सोशल मीडियावर फेमस होण्याचं वेड हे अगदी जीवघेणं ठरू शकतं. सोशल मीडियात लाइक्स आणि शेअरच्या जंजाळात अडकेली तरुणाई काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वत:च्या जीवाचीही पर्वा करत नाहीत. अशाच पद्धतीचा एक प्रकार हाँगकाँगमध्ये उघडकीस आला आहे. हाँगकाँगमध्ये एक महिला इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर धबधबाच्या ठिकाणी फोटो टिपत होती. त्याचवेळी पाय घसरुन घडलेल्या दुर्घटनेनं तिला जीव गमावावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेची आता जगभर चर्चा होत आहे. (Social media influencer plummets to death while snapping waterfall selfie)
समोर आलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगची इन्स्टाग्राम स्टार सोफिया शनिवारी सकाळी ११ वाजता आपल्या तीन मित्रमंडळींसोबत पाकलाई पार्कमध्ये भटकंतीसाठी गेली होती. यावेळी सनसेट पॉइंट म्हणून लोकप्रिय असलेल्या पाइनअॅप्पल माऊंटन साइटवर असलेल्या एका धबधब्याजवळ ती मोबाइलमध्ये फोटो टिपण्यासाठी पोहोचली. सेल्फी टिपताना सोफियाचा तोल गेला आणि ती उंचावरुन खाली पडली. सोफिया जवळपास १६ फूट खोल पाण्यात पडली. घटनेनंतर सोफियाच्या मित्रांनी तात्काळ बजाव पथकाला पाचारण केलं. बजाव पथकानं सोफियाला पाण्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी उपचार करण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
सोफिया हाँगकाँगमध्ये इन्स्टाग्राम स्टोर म्हणून खूप लोकप्रिय झाली होती. तिला अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची खूप आवड होती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन ती फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची.