Memes : दिवाळी येताच सोनपापडीवरील मीम्सचा धुमाकूळ, लोक म्हणाले , Karma Is Back!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 14:30 IST2019-10-24T14:29:01+5:302019-10-24T14:30:34+5:30

दिवाळीचा जल्लोष सुरू होताच पुन्हा एकदा सोनपापडी चर्चेत आली आहे. कारण पुन्हा एकदा नोकरदारांना सोनपापडीचे पॅकेट्स दिले जात आहे.

Soanpapdi is trending just ahead of Diwali users say Soanpapdi is like karma | Memes : दिवाळी येताच सोनपापडीवरील मीम्सचा धुमाकूळ, लोक म्हणाले , Karma Is Back!

Memes : दिवाळी येताच सोनपापडीवरील मीम्सचा धुमाकूळ, लोक म्हणाले , Karma Is Back!

दिवाळीचा जल्लोष सुरू होताच पुन्हा एकदा सोनपापडी चर्चेत आली आहे. कारण पुन्हा एकदा नोकरदारांना सोनपापडीचे पॅकेट्स दिले जात आहे. सोशल मीडियातील लोकांनी सोनपापडीला फारच मनावर घेतलं आहे. एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोनपापडीचे मीम्स व्हायरल झाले आहेत. तुम्हीही सोनपापडीचे पीडित असाल तर हे मीम्स बघून तुम्हाला नक्कीच थोडा दिलासा मिळेल.

सोशल मीडिया यूजर्स #sonpapdi हा हॅशटॅग वापरून त्या गोष्टींची चर्चा करताहेत, ज्याची दिवाळीत अधिक चर्चा होते. तशी तर सोनपापडी ही अनेकांची आवडती मिठाई आहे. पण गेल्या काही वर्षात याच्या गोडव्यावरून गंमतीदार मेसेज केले जात आहेत. कारण या दिवसात घरात भेटवस्तू म्हणून दिलेल्या सोनपापडीचे कितीतरी डबे जमा होतात.

Web Title: Soanpapdi is trending just ahead of Diwali users say Soanpapdi is like karma