Video : रेल्वेच्या इंजिनात घुसला साप, ड्रायव्हर घामाघूम....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:01 IST2019-08-23T11:56:55+5:302019-08-23T12:01:11+5:30
लोको पायलटच्या कॅबिनमध्ये साप घुसला आणि डॅशबोर्डवर खेळू लागला.

Video : रेल्वेच्या इंजिनात घुसला साप, ड्रायव्हर घामाघूम....
घरात, घराच्या अंगणात किंवा गाड्यांमध्ये साप घुसल्याचे अनेक पाहिले असेल, पण ट्रेनमध्ये साप घुसल्याच्या घटना क्वचितच ऐकायला मिळतात. त्यात लोको पायलटच्या कॅबिनमध्ये साप घुसल्याचं तर कधी फारसं ऐकिवात आलं नाही. मात्र, अशी एक घटना नुकतीच घडली आणि याचा व्हिीडीओ व्हायरल झाला आहे. जम्मू-उधमपूर मेलच्या लोको पायलटच्या कॅबिनमध्ये साप घुसला आणि लोको पायलटचे धाबे दणाणले.
आता समोर साप आहे अशात लोको पायलटची अवस्था काय झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. लोको पायलटने वेळीच या घटनेची कल्पना कंट्रोल रूमला दिली. सुदैवाने ट्रेन थांबलेली होती. त्यामुळे साप डॅशबोर्डवर काही वेळ इकडे तिकडे फिरून बाहेर निघून गेला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी रात्री साढे नऊ वाजताच्या आसपासची आहे. लुधियानाजवळ ट्रेनमध्ये इंजिनच्या लोको पायलटला साप दिसला.