अभ्यास सोडून मोबाईलवर बनवत होती व्हिडिओ, आईने थेट कानशिलातच लगावली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 19:09 IST2021-08-08T18:45:27+5:302021-08-08T19:09:59+5:30
एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे.

अभ्यास सोडून मोबाईलवर बनवत होती व्हिडिओ, आईने थेट कानशिलातच लगावली...
सोशल मीडियावर (social media) अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील लहान मुलांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. लहान मुलांनी खट्याळपणे केलेल्या खोड्या पाहून मूड फ्रेश होत असल्यामुळे असे व्हिडिओ (viral video) व्हायरलसुद्धा होतात. सध्या मात्र एका छोट्या मुलीचा व्हिडीओ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. व्हिडीओ तयार करताना एका छोट्या मुलीला तिच्या आईने चांगलाच धडा शिकवला आहे.
व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी दिसत आहे. आजकाल शॉर्ट व्हिडीओंचा ट्रेंड असल्यामुळे व्हिडीओतील मुलगी रिल्स तयार करताना दिसत आहे. ती सध्या चर्चेत आलेलं ‘फोन काट दी मम्मी आ गयी क्या’ या हिंदी गाण्यावर वेगवेगळे हावभाव करत आहे. मात्र, यावेळी व्हिडीओतील छोट्या मुलीची आई मध्ये आली आहे. अभ्यास सोडून मोबाईलमध्ये वेळ घालवत असल्यामुळे व्हिडीओतील मुलीवर तिची आई चांगलीच चिडली आहे. छोटी मुलगी हावभाव करण्यात मग्न असताना तिच्या आईने तिच्या थेट कानशिलात लगावली आहे. गालावर जोरदार प्रसाद मिळाल्यामुळे मुलगी भोकाड पसरते.
हा व्हिडिओ rvcjinsta या इन्स्टाग्राम (instagram) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला ४ लाखापेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.