Woman forest officer dances: आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 06:12 PM2021-03-11T18:12:28+5:302021-03-11T18:16:39+5:30

Woman forest officer dances in joy as rain showers after forest fire : राज्य सरकारनं बुधवारी दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि पाण्याच्या फवाऱ्याच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

Similipal national park woman forest officer dances in joy as rain showers after forest fire see viral video | Woman forest officer dances: आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Woman forest officer dances: आग लागलेल्या जंगलात अचानक बसरल्या पावसाच्या सरी; आनंदाच्या भरात महिला पोलिसानं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

Next

आशियाचं दुसरं सगळ्यात मोठं  ओडिशातील (Odisha) मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल नॅशनल पार्क  (Similipal National Park) सध्या आगीत जळत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळाल्या. राज्य सरकारनं बुधवारी दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि पाण्याच्या फवाऱ्याच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

याच घटनेशी निगडित एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media)  तुफान व्हायरल (Viral Video)  होत आहे. जंगलात फॉरेस्ट महिला अधिकारी  (Park Woman Forest Officer Dances)  डान्स करताना दिसून आली आहे. आग लागलेल्या जंगलात पाऊस आल्यानं ही महिला पोलिस प्रचंड खूश झाली आणि आनंदाच्या भरात तिने नाचायला सुरूवात केली आहे. 

ब्रिटनमध्ये सापडलेलं उल्कापिंड अत्यंत दुर्मिळ; 'असा' होणार पृथ्वीवरील जीवनाचा खुलासा, पाहा व्हिडीओ 

पाऊस येण्याच्या आनंदात ही महिला अधिकारी खुश होऊन ओरडत आहे आणि डान्स करत आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता ही महिला एकटीच डान्स करत आहे आणि देवानं आपलं म्हणणं ऐकल्यामुळे धन्यवादसुद्धा म्हणत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर  भारतीय फॉरेस्ट ऑफिसर रमेश पांडे यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, याप्रकारे पाऊस देवाची मदत करत आहे. ओडीसाच्या सिमलीपालच्या अग्निशमन दलातील महिला वनपाल यांचा आनंद तुम्ही पाहू शकता. 

 काय सांगता? २९ हजार लिटर दारू उंदरांनी संपवली; पोलिसांचा दावा वाचून तुम्हीही व्हाल अवाक्....

मयूरभंज एलिफंट रिझर्व्हचा भाग - 

हा पार्क म्हणजे मयूरभंज एलिफंट रिझर्व्हचा भाग आहे. याच बरोबर टायगर रिझर्व्हदेखील आहे. एवढेच नाही, तर हा पार्क जोरांदा आणि बेरीपानी फॉल्‍स सारख्या सुंदर सरोवरांसाठीही प्रसिद्ध आहे. यूनेस्‍कोने 2009 मध्ये या पार्कला वर्ल्‍ड नेटवर्क ऑफ बायोस्‍पेअर रिझर्व्ह म्हणूनही घोषित केले होते. यामुळे येथे लागलेली आग हा चिंतेचा विषय आहे. 

3000 प्रकारची झाडं अन् वनस्पती -

गेल्या 10 दिवसांपासून या जंगलाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडियन एक्‍सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पार्कमध्ये एकूण 399 फायर पॉइंट्सची ओळख झाली आहे. हा पार्क लाल सिल्‍क कॉटन झाडांसाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे याच झाडांवरून या पार्कला नाव मिळाले आहे. कारण ही झाडे याच भागात बघायला मिळतात. या जंगलात 3000 प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत. यात 94 प्रकारच्या प्रजाती एकट्या ऑर्किडच्या आढळून येतात. विशेष म्हणजे या जंगलात अथवा नॅशनल पार्कमध्ये पानी आणि जमिनीवर राहू शकतील असे 12 प्रकारचे प्राणी, 29 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 264 प्रकारचे पक्षी आणि 42 प्रकारचे सस्तन प्राणी आहेत.

Web Title: Similipal national park woman forest officer dances in joy as rain showers after forest fire see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.