Video: रस्त्यात बाईक आडवी टाकली, मुलीला खाली पाडलं, गळ्यातली चेन चोरली अन् मग आला 'ट्विस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:02 IST2026-03-12T17:56:37+5:302026-03-12T18:02:03+5:30
Shocking Viral Video: महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून पळणाऱ्या चोराचा फिल्मी स्टाईल व्हिडीओ व्हायरल

Video: रस्त्यात बाईक आडवी टाकली, मुलीला खाली पाडलं, गळ्यातली चेन चोरली अन् मग आला 'ट्विस्ट'
Shocking Viral Video: आजकाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, सामान्य नागरिकांनी दाखवलेले धाडस गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून पळणाऱ्या सोनसाखळी चोराला फिल्मी स्टाईल पकडले.
नेमकी घटना काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला रस्त्यावरून जात असताना मोटारसायकलवरून आलेला भुरटा सोनसाखळी चोर तिच्या गळ्यातील साखळी ओढण्याचा प्रयत्न करतो. या झटापटीत दोघेही जमिनीवर पडतात. चोर सोनसाखळी हिसकावून पुन्हा दुचाकीवर बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो. पण तितक्यात महिला जोरजोरात आरडाओरडा करते. महिलेचा आवाज ऐकून जवळच्या घरातील एक तरुण-तरुणी बाहेर आले. चोराची दुचाकी सुरू होऊन ती वेगात पुढे जाण्यापूर्वीच घरातून आलेल्या तरुणाने चोराच्या दिशेने धाव घेतली आणि धावत जाऊन त्याला गाठले व पकडून ठेवले. पाहा व्हिडीओ-
चेन स्नैचिंग की कोशिश के दौरान एक युवती ने मदद के लिए आवाज़ लगाई, तो एक बहादुर पड़ोसी तुरंत संदिग्ध के पीछे दौड़ा, उसे पकड़ लिया और पुलिस के हवाले कर दिया।
— 𝙼𝚛 𝚃𝚢𝚊𝚐𝚒 (@mktyaggi) March 12, 2026
अगर आपके आसपास ऐसा कुछ होता, तो क्या आप भी इस युवक की तरह आगे बढ़कर मदद करते? 🤔 pic.twitter.com/jucnkpJu5F
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने चोराला पकडून ठेवल्यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा २२ सेकंदांचा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर @mktyaggi या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकरी या तरुणाच्या हिमतीचे कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले की, अशा धाडसी नागरिकांमुळेच समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. पण हा व्हिडिओ नेमका कुठल्या शहरातला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, चोराला पकडणाऱ्या या 'रिअल लाईफ हिरो'ची सर्वत्र चर्चा आहे.