80 Kg Python broke roof falls on couch, Viral video: हल्ली कधी काहीही घडू शकतं असं वारंवार म्हटलं जातं. आता असा विचार करा की, तुम्ही घरातल्या सोफ्यावर बसून आरामात टीव्ही पाहत आहात आणि अचानक वरून अजगर छत फाडून तुमच्यावर पडला तर... कोणत्याही सर्वसामान्य माणसाला सर्वात आधी घाबरायला होईल. घसा कोरडा पडेल. असाच एक विचित्र प्रसंग एका कुटुंबासोबत घडला. एक कुटुंब घरात सोफ्यावर बसले होते, तेव्हा तीन मीटरपेक्षा जास्त लांबीचा आणि सुमारे ८० किलो वजनाचा महाकाय अजगर छत तोडून त्यांच्यावर पडला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
मलेशियातील कामुंटिंगमधील कंपुंग ड्यू येथे हा प्रकार घडला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे सांगितले जाते की अजगर हा जवळच्या पामच्या झाडाच्या ग्रोव्ह्जमध्ये होते. तेथून तो या कुटुंबाच्या घरावर आला. २२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. हा विचित्र प्रकार पाहून घाबरलेल्या कुटुंबाने लगेच तैपिंग जिल्हा नागरी संरक्षण दलाला फोन केला. यानंतर बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून अजगराला नीट ताब्यात घेतले आणि नॅशनल पार्कमध्ये सोडून दिले.
अजगर छत फोडून बाहेर आला तेव्हाचा व्हिडीओ पाहा-
-----
अजगराला यशस्वीपणे केलं पिंजऱ्यात बंद
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, अजगराला पकडण्यासाठी बचाव पथकाला घरातील छताचा काही भाग तोडावा लागला. नेक्स्टा टीव्हीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बचावकार्यातील काही भाग दिसतोय. छताला एक मोठे भोक आणि सोफ्यावर पडलेला महाकाय अजगर पाहून सोशल मीडिया युजर्सही चांगलेच घाबरले.