VIDEO : मगरीनं खाल्लं ड्रोन, मग तोंडातून निघू लागला धुरच धूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 12:53 IST2021-09-02T12:52:19+5:302021-09-02T12:53:50+5:30

ड्रोन फोटो काढत असताना मगरीने त्यावर अचानक हल्ला केला. मगरीने ड्रोन आपल्या जबड्यात पकडला. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं.

Shocking video crocodile ate drone and smoke coming from his mouth | VIDEO : मगरीनं खाल्लं ड्रोन, मग तोंडातून निघू लागला धुरच धूर!

VIDEO : मगरीनं खाल्लं ड्रोन, मग तोंडातून निघू लागला धुरच धूर!

अमेरिकेतील फ्लोरिडा तेथील मगरींमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. इथे तर मगरी रस्त्यांवरही फिरताना दिसतात. एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक ड्रोन मगरीचे काही फोटो घेताना दिसत आहे. तेव्हा अचानक मगरीने ड्रोनवर हल्ला केला. 

ड्रोन फोटो काढत असताना मगरीने त्यावर अचानक हल्ला केला. मगरीने ड्रोन आपल्या जबड्यात पकडला. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं. मगरीच्या तोंडातून धूर निघताना दिसत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं सांगितलं जात आहे की, ड्रोनच्या पॉवरमुळे मगरीच्या तोंडातून धूर निघत होता.

या व्हिडीओत लोकही बोलताना दिसत आहेत की, कॅमेरा खाऊ नको. एका महिलेचा भावूक आवाजही ऐकायला मिळतो. अर्थाच कॅमेरा खाल्ल्यावर मगरीला फार त्रास झाला असेल. आता त्याची स्थिती कशी आहे हे समजू शकलेलं नाही. पण अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. एका मगरीने ड्रोन कॅमेरा खाल्ल्याचं पाहून लोकही हैराण झाले आहेत.
 

Web Title: Shocking video crocodile ate drone and smoke coming from his mouth