Airport Viral Video: एअरपोर्टवर प्रवासी सामानाची वाट पाहत असताना अचानक 'ती' वस्तू आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:01 IST2022-05-23T19:00:42+5:302022-05-23T19:01:35+5:30
वस्तू कन्वेयर बेल्टवर येताच प्रवासी घाबरले

Airport Viral Video: एअरपोर्टवर प्रवासी सामानाची वाट पाहत असताना अचानक 'ती' वस्तू आली अन्...
Airport Viral Video: सोशल मीडिया हे व्हिडीओंचे भांडार आहे. तेथे विविध व्हिडीओ दिसतात. अनेक वेळा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांना हैराण (Shocking Videos) करतात. अशाच एका व्हिडिओने सध्या खळबळ उडवून दिली आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. 'व्हायरल हॉग'च्या यूट्यूब पेजवर शेअर केलेल्या या व्हिडिओला ४२ दशलक्षपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ लंडन विमानतळाचा आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार, प्रवासी कन्व्हेयर बेल्टजवळ त्यांच्या सामानाची वाट पाहत होते. या दरम्यान लोकांना एक विचित्र गोष्ट दिसली. वस्तू बबल रॅपमध्ये गुंडाळलेल्या आणि घट्ट टेप लावल्यासारखी होती. ही वस्तू एखाद्या डेड बॉडीसारखी होती. अशी वस्तू पाहून लोक हैराण झाले. पाहा व्हिडीओ-
'व्हायरल हॉग'च्या म्हणण्यानुसार, हा व्हिडीओ २०१७ सालचा आहे. पण तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. मृतदेहासारखी दिसणारी ही विचित्र वस्तू प्रत्यक्षात एक पुतळा होता. एका माणसाने स्कॉटलंडमधून तो पुतळा विकत घेतला होता आणि तो घेऊन ती व्यक्ती लंडनला परतत होती. रॅपमध्ये गुंडाळलेली वस्तू काय आहे, हे लोकांना माहीत नसल्याने लोक काहीसे घाबरले. ज्या पद्धतीने ती वस्तू गुंडाळली गेली होती, त्यामुळे ती डेड बॉडीसारखी दिसत होती. अशा परिस्थितीत सामानाची वाट पाहत असलेले लोक हे दृश्य पाहून गोंधळून गेल्याचे दिसून आले.