Shocking video bear wakes up man napping by swimming pool watch | VIDEO : स्वीमिंग पूल शेजारी तो करत होता आराम, अचानक तिथे आलं अस्वल आणि...

VIDEO : स्वीमिंग पूल शेजारी तो करत होता आराम, अचानक तिथे आलं अस्वल आणि...

कल्पना करा की, तुम्ही एका स्वीमिंग पूलसमोर निवांतपणे आराम करत आहात आणि अचानक तुमच्या पायाला काहीतरी जाणवतं. तुम्ही डोळे उघडता आणि समोर एक भलं मोठं अस्वल दिसतं. तुम्ही काय कराल? अशीच एक घटना अमेरिकेतील मॅसाचुसेट्समध्ये एका व्यक्तीसोबत घडली. ही व्यक्ती पूलच्या बाजूला झोप घेत होती. त्याला झोप लागली असेल. अशात अचानक एक अस्वल तिथे येतं. पण त्याला याचा काहीच खबर नसते. अस्वल तिथून पळालं. पण या थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

हा व्हिडीओ फेसबुकवर Dawn Bete ने रविवारी शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, 'काल मॅट पूलवर आराम करताना थोडा धक्का बसला'. शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ३१ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर ७२३ रिअ‍ॅक्शन मिळालेत. तसेच लोक भरभरून कमेंटही करत आहेत.

व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की, एक काळ्या रंगाचं अस्वल पूलवर येतं. आधी तो पूलमधील पाणी पितो. नंतर आराम करत असलेल्या व्यक्तीच्या पायाचा वास घेतो. नंतर हाताने त्याच्या पायाला ओरबाडतो. ज्यामुळे व्यक्ती लगेच झोपेतून उठतो. तो झोपेतून उठल्यावर अस्वल तिथून पळ काढतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॅसाचुसेट्सच्या ग्रीनफिल्डमधील मॅथ्यू बीथे शनिवारी आपल्या स्वीमिंग पूलजवळ झोपत होते. दरवाजा उघडा असल्याने अस्वल सरळ पूलजवळ आलं. पूलमधील पाणी प्यायल्यानंतर अस्वलाने त्यांच्या पायाचा वास घेतला. झोपेतून उठल्यावर समोर अस्वल दिसल्याने मॅथ्यू हैराण झाले. सुदैवाने अस्वलाने त्यांना काही केलं नाही.

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी! संतापलेल्या हत्तीने एकावर केला हल्ला, बघा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

कासवाने मगरीच्या जबड्यातून असा वाचवला स्वत:चा जीव, बघा खतरनाक व्हिडीओ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking video bear wakes up man napping by swimming pool watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.