Video: बापरे! २५ फूटी अजगर माणसासारखा उभा राहिला, थेट झाडाची फांदी पकडून वर चढला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:05 IST2024-12-27T14:03:42+5:302024-12-27T14:05:29+5:30

Python climbing tree viral video: हे अजगर सुमारे २५ फूट लांब आणि ४५ इंच जाड असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shocking Video 25 feet big python climbing tree social media trending viral | Video: बापरे! २५ फूटी अजगर माणसासारखा उभा राहिला, थेट झाडाची फांदी पकडून वर चढला...

Video: बापरे! २५ फूटी अजगर माणसासारखा उभा राहिला, थेट झाडाची फांदी पकडून वर चढला...

Python climbing tree viral video: वन्यजीवांबद्दलचे अनेक व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील आद्री गावातील असून यात एक महाकाय अजगर दिसत आहे. या भल्यामोठ्या अजगाराचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक महाकाय अजगर झाडावर चढताना दिसत आहे. हे अजगर सुमारे २५ फूट लांब आणि ४५ इंच जाड असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय अजगर १० फूट उंच पेरूच्या झाडावर चढताना दिसत आहे. हा भयंकर साप ज्या प्रकारे माणसाच्या उंचीइतका उभा राहतो आणि झाडाची फांदी पकडतो, ते दृश्य भयावह आहे. या दृश्याने तेथे उपस्थित ग्रामस्थांना आश्चर्य तर वाटलेच, पण त्याचबरोबर धक्काही बसला.

सांगितले जात आहे की, या प्रकार पाहिल्यानंतर काही गावकरी घाबरले होते. गावातील काही लोकांचा दावा आहे की त्यांनी याआधीही अजगर गावात फिरताना पाहिला आहे. या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली. या अजगराला जंगलात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Shocking Video 25 feet big python climbing tree social media trending viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.