Video: भन्नाट झुंज! रानगव्याने दाखवला इंगा; सिंहाला पायात धरलं, आदळलं अन् पळवून लावलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:27 IST2024-12-26T12:27:22+5:302024-12-26T12:27:53+5:30

wildebeest lion fight video: रानगवा इतक्यावरच थांबला नाही. तो सिंहाचा पाठलाग करून त्याला दूरवर पळवून लावतो

shocking fight video between wildebeest lion fight video and lion in jungle trending on social video | Video: भन्नाट झुंज! रानगव्याने दाखवला इंगा; सिंहाला पायात धरलं, आदळलं अन् पळवून लावलं...

Video: भन्नाट झुंज! रानगव्याने दाखवला इंगा; सिंहाला पायात धरलं, आदळलं अन् पळवून लावलं...

wildebeest lion fight video: रस्त्यावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी कुणाचं भांडण चालू असेल तर बरीच गर्दी जमा होते. लोकांना त्या भांडणात भलताच रस असतो. काही लोक तर अशा भांडणाचा व्हिडीओही काढतात आणि व्हायरल करतात. प्राण्यांमध्येही अशा प्रकारची भांडणं आणि झडप होणं सामान्य गोष्ट आहे. वन्यजीवांच्या संबंधीचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. काही वेळा वाघ-सिंहाने एखाद्या प्राण्याची शिकार केल्याचेही व्हिडीओ व्हायरल होतात. पण एखाद्या रानगव्याने सिंहाला पळवून लावलेले तुम्ही कधी पाहिले आहे का? रानगव्याची ताकद आणि धाडस दाखवणारा एक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सिंह आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असतो. त्यावेळी त्याची नजर एका रानगव्यावर पडते. त्यानंतर संधी पाहून तो रानगव्यावर झडप घालायचा प्रयत्न करतो. पण त्याला रानगव्याच्या ताकदीचा अंदाज नसतो. सिंह रानगव्यावर हल्ला चढवणार इतक्यात रानगवा सिंहाला पायात पकडतो. दोघांमध्ये जोरदार झुंज पाहायला मिळते. या झुंजीत नेमकं काय होणार याकडे सारेच पाहू लागतात. अखेर सिंहावरील रानगव्याची पकड सैल होते. सिंह जमिनीवर पडतो आणि पळू लागतो. रानगवा इतक्यावरच थांबत नाही. तो सिंहाचा पाठलाग करून त्याला दूरवर पळवून लावतो.

पाहा सिंह - रानगवा यांच्यातील झुंज

दरम्यान, हा अवघ्या १२ सेकंदाचा व्हिडिओ आहे. @Am_Blujay या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 59 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओवर यूजर्सच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

Web Title: shocking fight video between wildebeest lion fight video and lion in jungle trending on social video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.