धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:02 IST2025-08-07T15:58:46+5:302025-08-07T16:02:13+5:30
पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राणी क्रूरता कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई झालेली नाही.

धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
राजस्थानमधील झुंझुनूं जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने बकऱ्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या नावाखाली २५ निष्पाप कुत्र्यांना निर्घृणपणे गोळ्या घातल्या. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीवरून दोन लोक भटक्या कुत्र्यांचा पाठलाग करत आहेत आणि मागे बसलेला व्यक्ती त्यांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार करत असल्याचे दिसतंय.
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
ही घटना २ आणि ३ ऑगस्टची नवलगडच्या कुमावास गावात घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून गावातील इतर कुत्रे जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसले, पण आरोपींनी एकामागून एक २५ कुत्र्यांना ठार मारले. रक्ताने माखलेल्या कुत्र्यांचे मृतदेह गावातील रस्त्यांवर आणि शेतात पडले होते.
पोलिसांनी कारवाई केली
व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस कारवाईला लागले. प्राथमिक तपासात आरोपीचे नाव श्योकंद बावरिया असे आढळून आले आहे, हा डुमरा गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्राणी क्रूरता आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, पण त्याला अजूनही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्हिडिओची चौकशी करण्यासाठी एका हेड कॉन्स्टेबलला गावात पाठवण्यात आले आहे आणि लवकरच कारवाई केली जाईल.
गावातील एकाही बकरीवर कुत्र्यांनी हल्ला केला नाही
आरोपीने कुत्र्यांनी त्याच्या शेळ्या मारल्या होत्या, म्हणून त्याने रागात कुत्र्यांना मारण्यासाठी बाहेर पडला, असल्याचा दावा केला. पणगावाच्या माजी सरपंचाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. गावात कोणाचीही बकरी मेली नाही किंवा कुत्र्यांनी कोणालाही इजा केली नाही, असे सरपंचांनी म्हटले आहे. सरपंचांनी शेओचंदवर खोटे बोलून नुकसानभरपाई मागण्याचा आरोपही केला आहे.
राजस्थान के झुंझुनू में एक बदमाश हाथों में बंदूक लेकर निकाला और एक-एक करके उसने 25 कुत्तों को गोली मार दी ! #jhunjhunupic.twitter.com/nzMpAj87Zk
— ReporteR Sahab (@ReporterSahab) August 6, 2025