'ती किंचाळली अन् तो फसला', गर्लफ्रेंडला हॉस्टेलमधील खोलीवर नेण्याचा प्लॅन, पण झाली एक चूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:12 IST2025-04-12T12:08:47+5:302025-04-12T12:12:31+5:30
गर्लफ्रेंडला हॉस्टेलमधील रुमवर घेऊन जाण्याचा एका तरुणाचा प्लॅन एका चुकीमुळे फसला. एका खासगी विद्यापीठात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'ती किंचाळली अन् तो फसला', गर्लफ्रेंडला हॉस्टेलमधील खोलीवर नेण्याचा प्लॅन, पण झाली एक चूक
Girlfriend Boys hostel: एक व्हिडीओ जो बघून तुम्हालाही हसायला येईल. एका खासगी विद्यापीठात शिकत असलेल्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला हॉस्टेलमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन केला. मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलींना प्रवेश नसल्याने त्याने एक शक्कल लढवली. पण, तरुणीच्या एका चुकीने त्याचे बिंग फुटले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जो व्हिडीओ व्हायरल होतोय, हरयाणातील सोनीपत शहरातील आहे. एका खासगी विद्यापीठात तरुण शिक्षण घेत आहे. तो विद्यापीठातच मुलांच्या वसतिगृहात राहायला आहे. त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला हॉस्टेलला आणायचे होते, पण मुलांच्या वसतिगृहात मुलींना प्रवेश नसल्याने त्याने एक प्लॅन बनवला. तो म्हणजे गर्लफ्रेंडला एका मोठ्या सुटकेसमध्ये लपवून आणण्याचा.
ती ओरडली अन् तो फसला
तरुणाने गर्लफ्रेंडला एका मोठ्या सुटकेसमध्ये बसवले आणि सुटकेस घेऊन तो वसतिगृहात आला. वसतिगृहात प्रवेश केल्यानंतर ओढत असताना सुटकेस एका ठिकाणी आदळली आणि झटका बसला. त्यामुळे सुटकेसमध्ये बसलेली तरुणी जोरात किंचाळली.
वाचा >>याला म्हणतात नशीब! रद्दीमध्ये सापडलं वडिलांचं जुनं पासबुक; बदललं आयुष्य, झाला करोडपती
मुलीचा आवाज ऐकल्यानंतर वसतिगृहाचा सुरक्षारक्षक खडबडून जागा झाला. त्यानंतर त्याने तरुणाला थांबवले. त्याला सुटकेस उघडण्यास सांगितले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे इतर कर्मचारीही तिथे आले. त्यानंतर सुटकेस उघडण्यात आली, त्यावेळी त्यामध्ये तरुणी बसलेली असल्याचे दिसले.
Guy tried Sneaking his Girlfriend into the Boys hostel in a Suitcase.. one Bump and she screamed from inside. guards Heard it and they got Caught, Op Jindal Uni
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 12, 2025
pic.twitter.com/xBkBTYymdt
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कर्मचारी सुटकेस उघडताना दिसत आहेत. आजूबाजूला सुरक्षा रक्षक आणि काही कर्मचारीही दिसत आहेत. तरुणाची गर्लफ्रेंड त्याच विद्यापीठात शिकत आहे की, बाहेर दुसऱ्या ठिकाणी शिकायला आहे, याबद्दल माहिती कळू शकली नाही.