Shark Tank मधला अशनीर ग्रोव्हर भजनात झालाय मग्न?, व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 17:25 IST2022-08-03T17:25:19+5:302022-08-03T17:25:46+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

shark tank india ashneer grover look alike video viral on social media his doppelganger doing kirtan chk video | Shark Tank मधला अशनीर ग्रोव्हर भजनात झालाय मग्न?, व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला…

Shark Tank मधला अशनीर ग्रोव्हर भजनात झालाय मग्न?, व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला…

Ashneer Grover look alike Video: शार्क टँक इंडियाचा जज (Shark Tank India) अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) हा तर तुम्हाला लक्षातच असेल. शोदरम्यान त्याचं बोलणं हे सर्वांच्याच लक्षात राहण्यासारखं होतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये अशनीर ग्रोव्हरप्रमाणेच दिसणारी एक व्यक्ती इस्कॉन मंदिरातील भजनात मग्न झालेली दिसत आहे.

सोशल मीडियावर एका व्यक्तीनं तो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर अशनीर ग्रोव्हरनं आपल्याच प्रकारे त्यावर मजेशीर कमेंट केलं. भाई इतक्या मजेनं कीर्तन करतोय जितकी मजा मला व्यवसायात येते. सुपर फन, असं कमेंट अशनीर ग्रोव्हरनं त्यावर केलं आहे.



अशनीर ग्रोव्हरसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडीओ पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. शार्क टँक इंडियादरम्यान अशनीर ग्रोव्हर प्रसिद्धी झोतात आला होता. त्याच्या बार्गेनिंग स्किल्सही लोकांना आवडल्या होत्या.

Web Title: shark tank india ashneer grover look alike video viral on social media his doppelganger doing kirtan chk video