शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शकीराच्या आवाजात तिने दिली पिझ्झाची ऑर्डर, शकीरा म्हणाली... मी तुझा पिझ्झा बनवून देऊ का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:50 IST

एका पॉप गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही गायिका पिझ्झा ऑर्डर करताना शकीराचा आवाजात गाणं म्हणत पिझ्झाची ऑर्डर देत आहे. हा व्हिडीओ खुद्द शकिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही, असाच एका पॉप गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ही गायिका पिझ्झा ऑर्डर करताना शकिराचा आवाजात गाणं म्हणत पिझ्झाची ऑर्डर देत आहे. हा व्हिडीओ खुद्द शकीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिनं हा व्हिडीओ खूप आवडल्याचं म्हटलं आहे. ज्या गायिकेचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती अमेरिकन आयडॉलचं सिझन १२ ची सेमीफायनलिस्ट आहे, तिचं नाव आहे शुबा वेदुला. हा व्हिडीओ सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनतो आहे. 

तुम्ही जर डोळे मिटून हा व्हिडीओ ऐकला तर तुम्हाला शकीराच गात असल्याचा भास होईल, पण ही शकिरा नसून शुबा वेदुला आहे. शकिराला हा व्हिडीओ इतका आवडला आहे की तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. पिझ्झा मागवण्याची शुबाची ही पद्धत अनेकांना आवडली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, ज्याला शुबा पिझ्झाची ऑर्डर देत आहे, त्यालाही आधी कळत नाही की हे काय सुरु आहे. तो शुबाला अनेक प्रश्न विचारतो, ज्याची सर्व उत्तरं शुबा शकीराच्या आवाजात आणि गाण्याच्या अंदाजातच देते. या पिझ्झा कर्मचाऱ्यालाही हे खूप आवडतं, आणि तो विचारतोही की तू शकीरा आहेस का? त्यालाही शकीराच बोलत असल्याचा भास होतो.

ही क्लिप पाहिल्यानंतर शकीरानेही तिच्यासोबत रिल्स बनवलं आहे आणि हा व्हिडीओ आवडल्याचं सांगितलं आहे. कॅप्शनमध्ये शकीराने लिहलं आहे की,’ हॅलो शुबा, मी तुमची ऑर्डर घेऊ शकते का?’

शकीराने शेअर केलेल्या या व्हिडीओवर लोकांना कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकजण शुबाची तारीफ करताना दिसत आहे. ज्यांना शुबा माहितंही नव्हती, त्यांना या व्हिडीओमुळे ती माहित झाली आहे. कमेंट करताना एका युजरने लिहिलं, ‘शुबा जी, तुम्ही भन्नाट आहात’ दुसऱ्याने लिहिले, ‘हा व्हिडिओ खूपच भारी आहे’ तिसऱ्याने लिहिले, ‘शकीरा आणि शुबाच्या आवाजात फरकच वाटत नाही. याशिवाय अनेकजणांनी इमोजी वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शुबानेही या पोस्टवर कमेंट करत शकीराचे आभार मानले आहेत, आणि भविष्यात कधी सोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असं म्हटलं आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम