सीमा हैदरने इन्स्टावर शेअर केला प्रायव्हेट व्हिडीओ, यूजर म्हणाले - कमाल....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 15:43 IST2023-07-15T15:15:55+5:302023-07-15T15:43:21+5:30
Seema Haider and Sachin Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत सीमा हैदर आणि सचिन यांचे काही खास क्षण बघायला मिळत आहेत. दोघेही एकमेकांच्या जवळ दिसत आहेत.

सीमा हैदरने इन्स्टावर शेअर केला प्रायव्हेट व्हिडीओ, यूजर म्हणाले - कमाल....
Seema Haider Sachin Meena romantic video: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आणि भारतीय सचिन यांची लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत आहे. सीमा सध्या तिच्या इन्स्टा अकाउंटच्या विश्वात हरवली आहे. तिने तिचा आणि सचिनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यावर यूजरच्या अनेक कमेंट्स येत आहेत. अलिकडेच सीमाने तिचा पती सचिनसोबत रोमॅंटिक व्हिडीओ शेअर करणं सुरू केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत सीमा हैदर आणि सचिन यांचे काही खास क्षण बघायला मिळत आहेत. दोघेही एकमेकांच्या जवळ दिसत आहेत. तर काही व्हिडीओंमध्ये सीमा सचिनच्या केसांमध्ये हात फिरवताना दिसत आहे.
अशाच एका व्हिडिओत सीमा म्हणाली की, 'हा व्हिडीओ त्या जळणाऱ्या पाकिस्तानी लोकांसाठी आहे जे आमच्या विषयी वाईट विचार करतात. लोकांनी हवं ते करावं, माझ्यावर कोणतेही आरोप करावे. पण सचिन आणि माझ्यात काहीच बदलणार नाही'.
सीमा असंही म्हणाली की, ती भारतात नेहमीच एक हिंदू महिला बनून आपला पती सचिनसोबत राहणार. यावरही लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.