अनाया बांगर थायलंडमध्ये कुठे करणार नवी सर्जरी? डॉक्टर कोण असणार? VIDEO मधून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:01 IST2026-02-12T16:00:30+5:302026-02-12T16:01:22+5:30

Anaya Bangar Surgery Updates: वडील संजय बांगर यांनी परवानगी दिल्यामुळेच अनायाची पुढील वाटचाल सुरु

sanjay bangar transgender daughter anaya bangar undergo new surgery in thailand Who will be the doctor Information given in VIDEO | अनाया बांगर थायलंडमध्ये कुठे करणार नवी सर्जरी? डॉक्टर कोण असणार? VIDEO मधून दिली माहिती

अनाया बांगर थायलंडमध्ये कुठे करणार नवी सर्जरी? डॉक्टर कोण असणार? VIDEO मधून दिली माहिती

Anaya Bangar Surgery Updates: माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर आता अनाया बांगर म्हणून ओळखला जातो. अनाया बांगरने आता तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे, ती १४ मार्च रोजी बँकॉकमध्ये gender reassignment surgery करणार आहे. अनायाने ही माहिती एका व्हिडिओमार्फत शेअर केली. अनायाने सांगितले की या शस्त्रक्रियेमुळे तिच्यासारख्या अनेक ट्रान्सजेंडरना कन्फर्मटेबल वाटण्यास मदत होते. तिने इंस्टाग्रामवर याबद्दल पोस्ट करून तिच्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले आहे.


तिने या निर्णयाबद्दल सविस्तरपणे सांगितले की हा अचानक किंवा भावनिक निर्णय नव्हता, तर अनेक वर्षांच्या सुव्यवस्थित आणि वैद्यकीयदृष्ट्या मार्गदर्शन केलेल्या प्रक्रियेचा परिणाम होता. अनायाच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून तिने या टप्प्यावर पोहोचण्यासाठी मानसिक मूल्यांकन, नियमित थेरपी, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT), व्यापक वैद्यकीय मूल्यांकन आणि दोन पूर्वीच्या शस्त्रक्रिया पार पाडून इथवर आली. प्रत्येक टप्पा कायदेशीर चौकटीत आणि वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आला.


अनायाने स्पष्ट केले की तिची शस्त्रक्रिया बँकॉकमधील प्रसिद्ध सर्जन डॉ. चेट्टावुत (Dr. Chettawut in Bangkok) यांच्याकडून केली जाईल आणि ही एक स्किन ग्राफ्ट वॅजिनोप्लास्टी प्रक्रिया असेल. या शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्तीला वेळ लागू शकतो. पूर्णपणे बरे होण्यासाठी एक वर्ष लागू शकते. या प्रवासात तिच्या कुटुंबाचा पाठिंबा ही एक मोठी ताकद राहिली आहे. तिने सांगितले की आता तिला तिच्या कुटुंबाचा, विशेषतः तिच्या वडिलांचा भावनिक आणि आर्थिक पाठिंबा आहे, जो तिच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. तिच्या निवेदनात, अनायाने म्हटले आहे की हे पाऊल कोणालाही काहीही सिद्ध करण्यासाठी नाही, तर तिच्या अंतर्मनातील ओळख आणि तिच्या शरीराचा कम्फर्ट शोधण्यासाठी हे सारे करत आहे.

Web Title : अनाया बांगर थाईलैंड में कराएंगी लिंग परिवर्तन सर्जरी: विवरण सामने आया

Web Summary : पूर्व क्रिकेटर संजय बांगर की बेटी अनाया बांगर 14 मार्च को बैंकॉक में लिंग परिवर्तन सर्जरी कराएंगी। वह थेरेपी और एचआरटी के साथ इसकी तैयारी कर रही हैं। सर्जरी डॉ. चेट्टावुत द्वारा की जाएगी। उनके परिवार ने उनके फैसले का समर्थन किया है।

Web Title : Anaya Bangar to Undergo Gender Reassignment Surgery in Thailand: Details Revealed

Web Summary : Anaya Bangar, daughter of former cricketer Sanjay Bangar, will undergo gender reassignment surgery in Bangkok on March 14. She has been preparing for this with therapy and HRT. The surgery will be performed by Dr. Chettawut. Her family supports her decision.