शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

Love All..! सचिन शब्दांच्या खेळातही 'मास्टर'; PV Sindhu साठी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:28 IST

पीव्ही सिंधू  होणाऱ्या पतीसोबत लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी थेट क्रिकेटच्या देवाच्या घरी पोहचल्याचे पाहायला मिळाले.

 भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधू आपल्या आयुष्यातील एका खास इनिंगला सुरुवात करणार आहे. २२ डिसेंबरला भारतीय शटलर  व्यंकट दत्त साई याच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. घरात लगीन घाई सुरु असताना पीव्ही सिंधू  होणाऱ्या पतीसोबत लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी थेट क्रिकेटच्या देवाच्या घरी पोहचल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी अगदी जोडीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबियांना लग्नाचे खास निमंत्रण दिले. 

मास्टर ब्लास्टर सचिनची PV Sindhu साठी खास पोस्ट

क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडत 'मास्टर ब्लास्टर' नावाने ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनं एक्स अकाउंटवरून पीव्ही सिंधू आणि तिचा होणारा पती व्यंकट दत्त साई यांच्यासोबतचा खास फोटो शेअर केला आहे. नव्या इनिंगला सुरुवात करणाऱ्या पीव्ही सिंधूला त्याने खास शब्दांत शुभेच्छा दिल्याचे दिसते. सिंधू अन् तिच्या होणाऱ्या जोडीदाराला लग्नाच्या शुभेच्छा देणारी सचिनची पोस्ट तो शब्दाच्या खेळातही 'मास्टर' असल्याचे दर्शवणारी आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चेत आहे.

सचिन तेंडुलकरनं पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?

बॅडमिंटनमध्ये स्कोअरची सुरुवात ही नेहमी 'Love' अशी होते. व्यंकट दत्ता साईसोबतचा तुझा प्रवास सुंदर अन् प्रेमानं बहरलेला असेल. तुमच्या आयुष्यातील खास क्षणी उपस्थितीत राहण्यासाठी  वैयक्तिकरित्या निमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आयुष्याच्या नव्या प्रवासातील आठवणी अन् आनंद यांची सुरेख रॅली पाहायला मिळो, अशा आशयाची पोस्ट शेअर करत सचिन तेंडुलकरनं बॅडमिंटन स्टार  पीव्ही सिंधूला आणि तिच्या जोडीदाराला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

'त्या' दोन शब्दांमुळे सचिनच्या पोस्ट ठरते एकदम खास

पीव्ही सिंधूसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं जी पोस्ट शेअर केली आहे त्याची सुरुवात 'लव्ह' या शब्दांनी होते. याशिवाय या पोस्टच्या शेवटी त्याने 'रॅली' हा शब्द वापरल्याचे दिसून येते. हे दोन्ही शब्द  बॅडमिंटन खेळात खास अर्थानं वापरले जातात.  खेळाडू किंवा दोन संघ बॅडमिंटनच्या कोर्टवर प्रतिस्पर्धा करण्यासाठी उतरतात त्यावेळी ०-० स्कोअर असतो. त्यावेळी बॅडमिंटनमध्ये Love ALL असा शब्दप्रयोग केला जातो. याशिवाय दोन्ही खेळाडूंमध्ये शटल खाली न पडू देता रंगलेला खेळाला 'रॅली' असं म्हटलं जाते. या दोन शब्दांचा सुरेख वापर करत तेंडुलकरनं फुलराणीला शुभेच्छा दिल्याचे आहेत. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरPV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadmintoncricket off the fieldऑफ द फिल्ड