सचिन तेंडुलकर एका क्रिकेटवर झालाय भारीच इम्प्रेस पण हा क्रिकेटर आहे चक्क एक कुत्रा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 06:17 PM2021-11-23T18:17:24+5:302021-11-23T18:17:41+5:30

कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने चेंडू पकडताना दिसत आहे ते पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना विचारले आहे, तुम्ही याला काय नाव द्याल?

Sachin Tendulkar shares video of dog doing excellent wicketkeeping netizens applaud | सचिन तेंडुलकर एका क्रिकेटवर झालाय भारीच इम्प्रेस पण हा क्रिकेटर आहे चक्क एक कुत्रा...

सचिन तेंडुलकर एका क्रिकेटवर झालाय भारीच इम्प्रेस पण हा क्रिकेटर आहे चक्क एक कुत्रा...

Next

‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेसोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कुत्रा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कुत्रा ज्या पद्धतीने चेंडू पकडताना दिसत आहे ते पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना विचारले आहे, तुम्ही याला काय नाव द्याल?

व्हिडिओ शेअर करताना सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला हा व्हिडीओ एका मित्राने फॉरवर्ड केला. हे पाहिल्यानंतर, मला असे म्हणायचे आहे की, हे जोरात पडणारे बॉल पकडण्याचं कौशल्य आहे. आपण क्रिकेटमध्ये अप्रतिम यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिले आहेत. पण तुम्हाला काय नाव द्यायला आवडेल?

व्हिडिओमध्ये दोन मुले घराजवळील रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. मुलांनी स्टंप म्हणून लाकडाचा वापर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुसऱ्या टोकाकडून चेंडू टाकताच कुत्रा लगेच धावतो आणि बॉल पकडतो. नंतर पुन्हा विकेटकीपिंग करायला सज्ज होतो. त्यानंतर जे काही घडते ते खरोखरच थक्क करणारे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा अप्रतिम विकेट कीपिंग करतोच पण वेगाने पळणारा बॉलही तोंडाने पकडतो. 

१ मिनिट १७ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत ६२ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. तर त्याला ८ हजाराहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ साडेसात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर चाहतेही यावर सातत्याने प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘कॅमेरा क्वालिटी बरोबर नाही, पण खरोखरच अप्रतिम व्हिडिओ आहे.’ त्याचवेळी आणखी एका यूजरने म्हटले की, आजच्या काळात टीम इंडियाला अशा ऑलराऊंडरची गरज आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लगान चित्रपटाची आठवण झाली आहे.

Web Title: Sachin Tendulkar shares video of dog doing excellent wicketkeeping netizens applaud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.