गेल्या दोन वर्षात अनेक बॉलिवुड अभिनेत्री लग्न बंधनात अडकल्या. लॉकडाऊनच्या काळातही अनेक मराठी अभिनेत्रींनी लग्न केलं. तुम्हाला माहीतच असेल. लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात सेलिब्रिटींनी घातलेल्या कपड्यांचे, ज्वेलरीचे, डिजाईन्सचे लोकांच्या मनात खूप आकर्षण असते. आपणही लग्नात सेलिब्रिटींप्रमाणे आकर्षक आणि डिसेंट लूक करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. अशाच एक नव वधूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) २०१८ मध्ये थाटामाटात लग्न केलं. अजूनही तिने घातलेल्या डिझाइनर ब्रायडल लेहंग्याची आवड नववधूंमध्ये पाहायला मिळते.

तरुणींच्या आवडत्या डिझाइनर ब्रायडल लेहंग्यांच्या यादीमध्ये दीपिकांच्या लेहंग्याला सर्वाधिक पसंती आहे. व्हायरल होत असलेल्या एका नववधूने दीपिकासारखा वेडींग लूक केला आहे.  अनेक तरुणी आपल्या लग्नासाठी अशाच  टाईपच्या लेहंग्याची निवड करताना दिसतात. ‘ब्राइड्स ऑफ सब्यसाची’ (Sabyasachi Mukherjee) या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या फोटोमधील नववधूनंही दीपिकाचा वेडिंग लुक कॉपी केला आहे.

‘ब्राइड्स ऑफ सब्यसाची’ या इन्स्टाग्राम पेजवर दिलेल्या माहितीनुसार,फोटोमध्ये दिसणाऱ्या या नववधूचं नाव सिमरत बोपाराए असे आहे. या नववधूनं आपल्या आयुष्याच्या खास क्षणासाठी दीपिका पादुकोणच्या लेहंग्यासारख्या डिझाइनची निवड केली. या लेहेंग्याचा दुपट्टा आणि त्यावरील डिजाईनसुद्धा दीपिकाच्या कपड्यांप्रमाणेच होती. नववधू सिमरतने आपल्या लग्नसोहळ्यासाठी वेगळ्या स्वरुपातील दागिन्यांची निवड केली होती.

दीपिका पादुकोणनं स्वतःच्या लग्नामध्ये प्रचंड वजनदार चोकर नेकलेस घातला होता. या नववधूने नवीन डिजाईनन्सचे दागिने  घातले आहे.  दिपीकाचे गळ्याभोवती एक मोठा नेकलेस घातला होता. तर या नववधूने लांबच लांब डिजाईन्सच्या दागिन्यांची निवड केली.  दीपिका पादुकोणचा ब्रायडल लुक तरुणींमध्ये जबरदस्त हीट आहे. यापूर्वीही कित्येक तरुणींना हा लुक फॉलो करताना पाहिलं गेलं आहे. 

दीपिका पादुकोणचा लग्नाचा लेहंगा प्रचंड महाग होता. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार या अभिनेत्रीने हे डिझाइनर आउटफिट तयार करण्यासाठी जवळपास १२ लाख रुपये खर्च केले होते. आता इतर तरूणीही लग्नासाठी दीपिकाप्रमाणे लेहंग्याची निवड करत त्यावर आपल्या हवे तसे दागिने आणि हवा तसा मेकअप करून परफेक्ट लूकमध्ये दिसत आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sabyasachi mukherjee lehenga collection bride wore deepika padukone bridal lehenga in her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.