प्रेमासाठी वाट्टेल ते, पाय ठेवशील तिथे नोटाच नोटा! व्हायरल VIDEO पाहून हैराण व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 14:10 IST2024-07-01T14:06:21+5:302024-07-01T14:10:50+5:30
आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वाट्टेल ते करण्यास तयार असतात.

प्रेमासाठी वाट्टेल ते, पाय ठेवशील तिथे नोटाच नोटा! व्हायरल VIDEO पाहून हैराण व्हाल
Social Viral : आवडत्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वाट्टेल ते करण्यास तयार असतात. अशाच एका प्रियकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रशियातील उद्योगपती सर्गेई कोसेन्को यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांनी त्यांच्या प्रेयसीसाठी चक्क नोटांची अनेक बंडलेच अंथरली.
कोसेन्को यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील रील शेअर केली आहे. प्रेयसीला ते हेलिकॉप्टरमधून उतरवितात. खाली प्रत्येक पावलावर नोटांची बंडले दिसतात. रीलवर त्यांनी लिहिले आहे की, "पैशांपेक्षा मी तुझ्यावर प्रेम करतो". रीलमध्ये दिसणाऱ्या नोट खऱ्या आहेत की खोट्या हे सांगता येणार नाही. मात्र, त्यावरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नोटांचा अशा पद्धतीने वापर भारतातील अनेकांना आवडला नाही. "हा पैशांचा अपमान असल्याचे काहींनी म्हटले". तर एकाने म्हटले की, "यातील दोन बंडल जरी मला मिळाले तरी आयुष्यभर आरामात जगता येईल".
@mr.thank.you नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सर्गेई कोसेन्को यांनी आपल्या प्रेयसीसोबतचा शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सर्गेई यांनी या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट तसेच तपकिरी रंगाची ट्राउजर परिधान केली आहे. मीडिया रिपोर्टनूसार, हा व्हिडिओ जुना असल्याची माहिती मिळत आहे. तरीही नेटकरी त्यावर भरभरून कमेंट करताना दिसत आहेत.