VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:18 IST2025-12-05T17:08:52+5:302025-12-05T17:18:16+5:30
Chebotarev Evgeny stunt viral video: हा व्हिडीओ पाहून दोन सेकंदासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही

VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
Chebotarev Evgeny stunt viral video: आपल्या खतरनाक स्टंटबाजीने सोशल मीडियाच्या जगात खळबळ उडवून देणारा रशियन तरुण एव्हगेनी चेबोटारेव्ह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रसिद्ध स्टंटमॅनने अलीकडेच एक धोकादायक कामगिरी करुन दाखवली आहे. त्याचा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की तो चक्क मृत्यूला स्पर्श करून परत आला आहे. स्टंट दरम्यान एव्हगेनीच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, ज्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. पण त्याने स्टंट मात्र नीट पार पाडला.
२०२३ मध्ये दोन उंच इमारतींमधून उडी मारण्याच्या भयानक स्टंटमुळे एव्हगेनी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यावेळी तो आणखी एक धोकादायक स्टंट करताना दिसला. या व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला एव्हगेनी १० टायर्सच्या उंच ढिगाऱ्यावर उभा असल्याचे दिसून आले. वेगाने जाणारी कार थेट टायर्सच्या ढिगाऱ्याकडे आली आणि टायर्सना उडवून गेली. स्टंट प्लॅननुसार, एव्हगेनीला कार टक्कर होण्यापूर्वीच बॅकफ्लिप करून रस्त्यावर सुरक्षितपणे उतरायचे होते. त्याने उत्तम बॅकफ्लिप केले, पण लँडिंगच्या वेळी त्याची उडी चुकली आणि तो रस्त्यावर तोंडाच्या दिशेने आदळला. त्याच्या तोंडाला थोडीशी दुखापत झाली. व्हायरल क्लिपच्या शेवटी एव्हगेनी रस्त्यावर बसून वेदनेने कळवळताना दिसला पण नंतर मात्र तो उठून सारंकाही नॉर्मल असल्यासारखे वागला. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, या व्हिडीओ त्याने स्वत: पोस्ट केला आहे. एव्हगेनी २०१८ पासून इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर @chebotarev_evgeny या युजरनेमने धोकादायक स्टंट व्हिडिओ पोस्ट करत आहे. पण त्याच्या अलीकडील स्टंटमुळे लोकांना प्रश्न पडला आहे की, फक्त व्ह्यूज आणि लाईक्ससाठी जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? काही लोक त्यामुळेच त्याच्यावर टीका करतानाही दिसत आहे.