VIDEO : उडी घेताना सैनिकाचं पॅराशूट हेलीकॉप्टरमध्ये अडकलं, नंतर जे झालं ते बघून व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:15 IST2021-03-19T14:14:16+5:302021-03-19T14:15:08+5:30
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ फारच धक्कादायक आणि धडकी भरवणारा आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक पॅराशूट हेलिकॉप्टरमध्ये अडकलं आहे.

VIDEO : उडी घेताना सैनिकाचं पॅराशूट हेलीकॉप्टरमध्ये अडकलं, नंतर जे झालं ते बघून व्हाल हैराण!
हेलीकॉप्टरमधून उडी घेणं हे एक अॅडवेंचर मानलं जातं. पण यात खूप रिस्क असतात. यात जराशी चूक वा दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना रशियातून समोर आली आहे. इथे आर्मीच्या एका जवानाचं पॅराशूट हेलीकॉप्टरमध्ये अडकलं होतं. त्यामुळे तो हेलीकॉप्टरला लटकून खाली उतरला.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ फारच धक्कादायक आणि धडकी भरवणारा आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक पॅराशूट हेलिकॉप्टरमध्ये अडकलं आहे. तर खाली एक व्यक्ती लटकलेली आहे. हेलीकॉप्टर उडतच आहे. खाली काही लोक त्या व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचले आहेत.
M24 च्या रिपोर्टनुसार, ही घटना रशियाच्या Kashtak गावातील आहे. पॅराशूटला लटकलेल्या माणसाचं नाव समजू शकलं नाही. पण ज्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला त्याचं नाव Maxim Stefanovich आहे. त्याने सांगितले की, हेलीकॉप्टरच्या आवाजाने आधी त्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ शूट केला. यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली.