Romance With Alligator: पाण्यात राहून मगरीशी वैर ऐकलं होतं, पण रोमान्स?, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 15:18 IST2022-03-29T15:17:55+5:302022-03-29T15:18:37+5:30
'पाण्यात राहून मगरीशी वैर' ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण मगरीसोबत रोमान्स करताना पाहिले नसेल.

Romance With Alligator: पाण्यात राहून मगरीशी वैर ऐकलं होतं, पण रोमान्स?, व्हिडिओ पाहून चक्रावून जाल
'पाण्यात राहून मगरीशी वैर करु नये,' ही म्हण तुम्ही कधी ना कधी ऐकलीच असेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती पाण्यात मगरीसोबतचा रोमान्स करताना दिसतोय. हो तुम्ही बरोबर वाचलं, एक व्यक्ती चक्क मगरीसोबत रोमान्स करतोय.
मगरीसोबत माणसाचा रोमान्स
सोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी-कधी हे व्हिडिओ पाहून आपल्याला धक्काही बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल किंवा तुम्हाला धक्का बसेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस पाण्यात एका महाकाय मगरीसोबत नाचताना दिसत आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहून युजर्सही चक्रावून गेलेत.
व्हिडिओत नेमकं काय आहे?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस एका मोठ्या मगरीसोबत डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने मगरीचा हात धरला आहे, जणू ते दोघे जोडपे आहेत. व्हिडिओमध्ये मगरीचे डोके माणसाच्या डोक्यावर आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून यूजर्सचाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. हे कसे घडले, असा प्रश्न व्हिडिओ पाहणारे आता विचारत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत 84 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, याशिवाय सुमारे 7 दशलक्ष युजर्सनी या व्हिडिओला लाईक केले आहे.