हल्ल्याच्या तयारीत होता जंगलाचा राजा सिंह, गेंड्यानं काही सेकंदात दिला धोबीपछाड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:57 IST2025-01-15T11:55:18+5:302025-01-15T11:57:21+5:30
Viral Video : सामान्यपणे सिंहासोबत भिडण्याची हिंमत कुणी करत नाही. पण काही प्राणी असे असतात जे सिंहाला काही मिनिटात त्याची जागा दाखवून देऊ शकतात.

हल्ल्याच्या तयारीत होता जंगलाचा राजा सिंह, गेंड्यानं काही सेकंदात दिला धोबीपछाड...
Viral Video : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. पण याचा अर्थ असा होत नाही की, त्याला कुणी धोबीपछाड देऊ शकत नाही. जंगलात असे अनेक प्राणी असतात जे सिंहाला धूळ चारू शकतात किंवा त्याला पळून जायला भाग पाडतात. आपली हिंमत आणि शक्तीच्या जोरावर ते सिंहाला मात देतात. असाच प्राणी आहे गेंडा. जो सिंहाला सहज मात देऊ शकतो.
सामान्यपणे सिंहासोबत भिडण्याची हिंमत कुणी करत नाही. पण काही प्राणी असे असतात जे सिंहाला काही मिनिटात त्याची जागा दाखवून देऊ शकतात. हेच दाखवणारा गेंड्याचा आणि सिंहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सिंह कसा पळून जातो हे बघायला मिळतं.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक सिंह मोठ्या आरामात गेंड्याकडे जात आहे. पण गेंड्याला याचा काही फरक पडत नाही. सिंह समोरून येत असल्याचं पाहून गेंडाही सिंहावर धावून जातो. हे बघून सिंह घाबरतो आणि मागे सरकतो. हा नजारा तिथेच उभी असलेली सिंहीण बघत असते. सिंह पुन्हा काही गेंड्याकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही.
हा व्हिडीओ ferociousplanet नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच लोकांनी यावर वेगवेगळ्या मजेदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत.