खवळलेल्या गेंड्याला पाहुन पळण्याऐवजी तिथेच थांबले, सुरु झाला जीवाशी खेळ अन् मग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:46 IST2021-10-28T13:07:06+5:302021-10-28T13:46:15+5:30
एका हौशी पर्यटकांचा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये यांच्यामागे फोटो काढता काढता विशाल गेंडा लागतो. पुढे जे घडलं ते खूपच भयावह होतं. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, घाम फुटेल, अंगावर काटा येईल.

खवळलेल्या गेंड्याला पाहुन पळण्याऐवजी तिथेच थांबले, सुरु झाला जीवाशी खेळ अन् मग
जंगली प्राणी बघण्यासाठी जंगल सफारीला जाणारे बरेच पर्यटक असतात. त्यांचे फोटो काढण्याची हौसही त्यांना असते. पण ही हौस जीवावरही बेतू शकते याचा विचार ते करत नाहीत. अशाच एका हौशी पर्यटकांचा खतरनाक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये यांच्यामागे फोटो काढता काढता विशाल गेंडा लागतो.
एक विशाल गेंडा गाडीच्या मागे वेगाने धावत आला (Rhino chasing jeep video). काही पर्यटक या गेंड्याला पाहून त्याचे फोटो काढत होते. गेंडा धावत येत असताना पळायचं सोडून त्यांनी गाडी तिथंच थांबली (Rhino attack video). पुढे जे घडलं ते खूपच भयावह होतं. व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल, घाम फुटेल, अंगावर काटा येईल.
व्हिडीओत पाहू शकता जंगलात एक जीप उभी आहे. एक भलामोठा गेंडा रस्त्यावर येतो. त्यावेळी जीपमधील तरुण या गेंड्याचा फोटो काढतो. सुरुवातीला अगदी शांत दिसतो. पण अचानकपणे तो चवताळतो आणि जीपसमोर धावत येतो. गेंड्याला आपल्या दिशेने धावत येताना पाहूनही ड्रायव्हर गाडी काही स्टार्ट करत नाही. गेंडा आपल्या धावण्याचा वेग वाढवतो आणि अगदी गाडीच्या जवळ येतो. तेव्हा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेतो. बऱ्याच अंतरापर्यंत गेंडा या गाडीचा पाठलाग करतो.
@AfricanBushKingdom फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सुदैवाने गेंडा काही अंतरानंतर आपली दिशा बदलतो आणि या पर्यटकांचा जीव वाचतो. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. आपल्या जीवाशी असा खेळ करू नका, जीव धोक्यात टाकू नका, असाच सल्ला बहुतेक युझर्सनी दिला आहे