खुलासा! दिवसभर काय-काय खातो 'इराणी हल्क'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 15:42 IST2018-08-13T15:35:57+5:302018-08-13T15:42:40+5:30
इराणमधील या 'हल्क' सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो तुम्ही याआधीही पाहिले असतील. जगभरात त्याला इराणी हल्क म्हणूनच ओळखले जाते.

खुलासा! दिवसभर काय-काय खातो 'इराणी हल्क'?
इराणमधील या हल्क सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे फोटो तुम्ही याआधीही पाहिले असतील. जगभरात त्याला इराणी हल्क म्हणूनच ओळखले जाते. त्याचं खरं नाव सज्जाद घारीबी असं आहे. त्याची बॉडी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्याच्या बॉडीकडे पाहून अनेकांना हा प्रश्न पडत असेल की, तो किती आणि काय खात असेल. आता त्याच्या डाएटचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊ इराणी हल्कच्या डाएटबाबत....
सज्जाद ब्रेकफास्ट न चुकता करतो. तो ब्रेकफास्टमध्ये राजमा, अंडी आणि काही एनर्जी ड्रिंकने तो दिवसाची सुरुवात करतो.
पोटभर ब्रेकफास्ट केल्यानंतर तो केवळ फळं खातो.
तर डिनरमध्ये तो मासे आणि मटर खातो.
सज्जाद दिवसभरात केवळ दोन-तीनदा नाही तर सात-आठ वेळा जेवण करतो. तेही वेगवेगळी पदार्थ तो खातो.
सज्जाद दिवसभरात पाणी भरपूर पितो. जास्त पाणी प्यायल्याने आरोग्य चांगलं राहतं असं त्याचं मत आहे.
अनेकवर्ष जिमनास्ट केल्यानंतर आता सज्जाद खेळांकडे वळत आहे. त्याला त्याच्या देशाचे नाव खेळांच्या माध्यमातून मोठं करायचं आहे.