जन्मताच कुत्रीची पिल्लं मेलीत, तिने मांजरीचे पिल्लं घेतली दत्तक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 09:45 IST2020-09-01T09:33:44+5:302020-09-01T09:45:02+5:30

जसं मनुष्यांना दु:खं होतं तसंच प्राण्यांनाही होतं. आपल्या पिल्लांना गमावल्यावर ही कुत्री दु:खात होती. तिला याची जाणीव होती की, तिची पिल्लं आता राहिले नाहीत.

Rescue dog who lost her puppies adopts trio of orphaned kittens | जन्मताच कुत्रीची पिल्लं मेलीत, तिने मांजरीचे पिल्लं घेतली दत्तक!

जन्मताच कुत्रीची पिल्लं मेलीत, तिने मांजरीचे पिल्लं घेतली दत्तक!

आईबद्दल तुम्ही जेवढं लिहाल तेवढं कमीच असतं. कारण आईला शब्दात, वाक्यात व्यक्त करता येत नाही. बातमी ही आहे की, एका कुत्रीचे पिल्लं मेलीत. आश्चर्याची बाब म्हणजे या कुत्रीने आता मोकाट मांजरीची पिल्लांचा सांभाळ करणं सुरू केलाय.

ही घटना आहे अमेरिकेच्या अ‍ॅरिझोनातील. इथे एक प्रेग्नेंट कुत्री तीन मोकाट मांजरीच्या पिल्लांची आई झाली आहे. 'द सनशाइन डॉग रेस्क्यू' या अ‍ॅनिमल रेस्क्यू ग्रुपने या कुत्रीला वाचवलं होतं. ही कुत्री प्रेग्नेंट असताना त्यांना मिळाली होती. पण नंतर तिची पिल्लं जन्मताच मरण पावले होते. 

जसं मनुष्यांना दु:खं होतं तसंच प्राण्यांनाही होतं. आपल्या पिल्लांना गमावल्यावर ही कुत्री दु:खात होती. तिला याची जाणीव होती की, तिची पिल्लं आता राहिले नाहीत. यादरम्यान रेस्क्यू टीमने फेसबुकवर एक मेसेज केला होता की, कुणाकडे काही मांजरीचे पिल्लं आहेत का, ज्यांचा सांभाळ करण्याची गरज आहे? यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. आता जॉर्जिया नावाच्या या कुत्रीला तीन पिल्लं मिळाली आहेत. या पिल्लांचा ती सांभाळ करते आहे. 

हे पण वाचा :

देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ 

OMG : अंगणात झोपलेल्या महिलेच्या तोंडात शिरला 4 फुटांचा साप, अन्...

Video : तहानलेल्या मांजरीनं असं काही केलं....; 'आत्मनिर्भर' मनीमाऊचा व्हिडीओ व्हायरल

Web Title: Rescue dog who lost her puppies adopts trio of orphaned kittens