अमेरिकेत पुनर्जन्म? 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू, 7 वर्षांच्या मुलाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:20 IST2024-08-15T15:19:11+5:302024-08-15T15:20:40+5:30
एका कार्यक्रमात मॉली म्हणाल्या, कॅड कधी कधी आर्ध्या रात्रीच रडायला सुरुवात करत होता आणि एक ऊंची इमारतीत काम करण्यासंदर्भात ओरडत उठत होता आणि नंतर, संपूर्ण घटनाक्रम सांगत होता. यात ऑफिसमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघू शकत होतो, असेही तो सांगत होता.

अमेरिकेत पुनर्जन्म? 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात झाला होता मृत्यू, 7 वर्षांच्या मुलाचा दावा
अमेरिकेतील 9/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे. आपल्याला आपला मृत्यू आटवतो असा दावा येथील एका 7 वर्षांच्या मुलाने केला आहे. कॅड नावाचा हा मुलगा सांगतो की, तो एका उंच इमारतीत काम करत होता. जेथून तो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी देखील बघू शकत होता. एका वृत्तानुसार, कॅडचे पालक, मॉली आणि रिक यांचे म्हणणे आहे की, कॅडच्या जन्मापासूनच त्याच्यात काही असामान्य गोष्टी होत्या. कॅड केवळ अडीच महिन्यांचा असतानाच चालण्याचा प्रयत्न करत होता. एवढेच नाही तर, वयाच्या दोन वर्षापासूनच त्याने अवघड आणि मोठे शब्द उच्चारायला सुरुवात केली होती.
एका कार्यक्रमात मॉली म्हणाल्या, कॅड कधी कधी आर्ध्या रात्रीच रडायला सुरुवात करत होता आणि एक ऊंची इमारतीत काम करण्यासंदर्भात ओरडत उठत होता आणि नंतर, संपूर्ण घटनाक्रम सांगत होता. यात ऑफिसमधून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघू शकत होतो, असेही तो सांगत होता.
कॅड जसजसा मोठा होत गेला, तसतसे त्याने आपल्या आईला आणखी सविस्तरपणे सांगायला सुरुवात केली की, त्याने स्वप्न पाहिले की, तो एका मोठ्या इमारतीवरून पडत आहोत. जसे त्याचा मृत्यू झाला होता. पुढे मॉली म्हणाल्या, तीन वर्षांच्या मुलाचे न्यूयॉर्कबद्दल बोलणे आणि मृत्यूबद्दल बोलणे हे अवास्तविक आहे. खरे सांगायचे तर मलाही वाटू लागले होते की, तो वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये तर नसावा? मात्र, माझे मन हे मान्य करण्यास तयार नव्हते, कारम असे होऊ शकत नाही.
कॅडचे वडील रिक सांगतात की, आम्ही त्याला काहीही दाखवलेलले नाही. यासंदर्भात त्याला माहिती होण्याचे काहीच करण नव्हते. ही तो शाळेत जाण्यापूर्वीची गोष्ट आहे. एवढेच नाही तर ही प्री-स्कूलच्याही आधीची गोष्ट आहे.