पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ McDonalds मध्ये सोडले डझनभर उंदीर; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:28 IST2023-10-31T17:27:18+5:302023-10-31T17:28:25+5:30
Rats Inside Mcdonalds: व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ McDonalds मध्ये सोडले डझनभर उंदीर; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
Rats Inside Mcdonalds: गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल-हमास यांच्यात विनाशकारी युद्ध सुरू आहे. यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. पॅलेस्टिनी समर्थकाने निषेधाची विचित्र पद्धत अवलंबली, ज्यामुळे लोकांना जबर धक्का बसला. व्हायरल क्लिपमध्ये एका व्यक्तीने मॅकडोनाल्ड आउटलेटमध्ये डझनभर उंदीर सोडल्याचे दिसत आहे.
हा विच्त्र व्हिडिओ बर्मिंगहॅममधील मॅकडोनाल्ड आउटलेटचा आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोक्यावर पॅलेस्टिनी ध्वज घातलेला दिसत आहे. तो कारच्या ट्रंकमधून प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेले डझनभर लाल, हिरवे, पांढरे आणि काळे उंदीर बाहेर काढतो आणि मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये सोडतो. अचानक एवढे उंदीर पाहून आऊटलेटमध्ये उपस्थित ग्राहक घाबरतात आणि मग इकडे-तिकडे धावायला लागतात.
पहा व्हिडिओ-
Rats in McDonald's 😮 pic.twitter.com/hTpzkQ0ZyV
— London & UK Street News (@CrimeLdn) October 30, 2023
‘फ्री पॅलेस्टाईन’चा नारा दिला
व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने बनावट नंबर प्लेट धरलेली दिसत आहे, ज्यावर PAISTN आणि Free Palestine असे लिहिले होते. गाडीकडे परतताना तो माणूस वारंवार 'फ्री पॅलेस्टाईन'च्या घोषणा देताना ऐकू येतो. ‘इस्राएलवर बहिष्कार घाला’ असेही तो यावेळी म्हणाला.
मॅकडोनल्डची निवड का केली?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या व्यक्तीने निषेध करण्यासाठी मॅकडोनाल्डची निवड का केली? याचे कारण म्हणजे, मॅकडोनाल्डने अलीकडेच हमासविरोधातील युद्धादरम्यान इस्रायली सैनिकांना मोफत फूड देण्याची घोषणा केली होती. यामुळे असा विरोध केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर मॅकडोनाल्डने रेस्टॉरंट पूर्णपणे स्वच्छ केले.