अरे देवा! उंदराने रात्रीच्या अंधारात चोरी केला डायमंड नेकलेस, CCTV फुटेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 09:43 IST2023-02-07T09:41:57+5:302023-02-07T09:43:37+5:30

Rat Steals Diamond Necklace:  एका उंदराने रात्रीच्या अंधारात डायमंड नेकलेस चोरी केला आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

Rat steals diamond necklace in the dark night cctv footage goes viral | अरे देवा! उंदराने रात्रीच्या अंधारात चोरी केला डायमंड नेकलेस, CCTV फुटेज व्हायरल

अरे देवा! उंदराने रात्रीच्या अंधारात चोरी केला डायमंड नेकलेस, CCTV फुटेज व्हायरल

Rat Steals Diamond Necklace:  अनेक सिनेमात ज्वेलरी शॉप किंवा म्युझिअममध्ये केल्या जाणाऱ्या खतरनाक चोऱ्यांचे हैराण करणारे सीन असतात. चोरी एकपेक्षा एक शक्कल लढवून चोरीचा प्लान करतात आणि कोट्यावधी रूपयांचे दागिने लंपास करतात. ज्वेलरी शॉपवर तर गार्डही असतात. पण जर चोरी करणारा मनुष्याच्या जागी एखादा प्राणी असेल तर गार्डही काय करणार. अशाच एका घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. एका उंदराने रात्रीच्या अंधारात डायमंड नेकलेस चोरी केला आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

महागडे दागिने दाखवणाऱ्या अनेक दुकानांवर मोठी सुरक्षा व्यवस्था असते. दुकानदार चोरी टाळण्यासाठी आवश्यक ते सगळे उपाय करतात. पण तरीही काही चोर हुशारी दाखवत चोरी करतातच. पण चोर जर एखादा उंदीर असेल तर तुम्ही काय करणार? सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही क्लीप आयपीएस अधिकारी राजेश हिंगणकर यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यात एक उंदीर नेकलेस डिस्प्लेजवळ बघू शकता. तो तिथे येतो आणि तिथे ठेवलेला एक नेकलेस दातात धरून पसार होतो.

व्हिडीओ शेअर करत आयपीएस अधिकारी राजेश हिंगणकर यांनी लिहिलं की,  'आता हा उंदीर डायमंड नेकलेस कुणासाठी घेऊन गेला असेल?'. यावर सोशल मीडियावरील लोकांनी वेगवेगळ्या आयडिया शेअर केल्या. अनेकांनी अंदाज सांगितले की, चोरी का झाली असेल. अनेकांनी यावर खूप मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांना हैराण करत आहे. 

Web Title: Rat steals diamond necklace in the dark night cctv footage goes viral