भर रस्त्यात दोन अस्वलं आपापसात भिडली; पाहा थरारक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:16 IST2019-09-23T16:14:24+5:302019-09-23T16:16:01+5:30

अस्वलांचे खेळ तुम्ही पाहिले असतीलच. तसेच अस्वलांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावरही अनेकदा व्हायरल होत असतात. परंतु, तुम्ही कधी दोन अस्वलांचा रस्त्याच्या मधोमध भांडतानाचा व्हिडीओ पाहिला आहे का?

Rare video two bear fight on middle of road watch viral video | भर रस्त्यात दोन अस्वलं आपापसात भिडली; पाहा थरारक व्हिडीओ

भर रस्त्यात दोन अस्वलं आपापसात भिडली; पाहा थरारक व्हिडीओ

अस्वलांचे खेळ तुम्ही पाहिले असतीलच. तसेच अस्वलांचे क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावरही अनेकदा व्हायरल होत असतात. परंतु, तुम्ही कधी दोन अस्वलांचा रस्त्याच्या मधोमध भांडतानाचा व्हिडीओ पाहिला आहे का? सोशल मीडियावर एका व्यक्तीने अद्भूत आणि दुर्लभ क्षण शेअर केले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 20 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक लांडगादेखील आहे. जो दूरूनच पळ काढतो. 

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या भांडणांचे दुर्लभ क्षण फेसबुक यूजर Cari McGillivray या यूजरने 21 सप्टेंबरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की, 'हे अद्भूत क्षण आहेत. जे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. व्हिडीओ व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्हाला एक लांडगाही दिसेल.' बातमी लिहिपर्यंत हा व्हिडीओ जवळपास 20 लाख लोकांनी पाहिला होता, तर 15 हजार लाइक्स आणि 66 कमेंट्स मिळाल्या होत्या. एवडचं नाहीतर हा व्हिडीओ 44 हजार वेळा शेअर करण्यात आला होता. 

काय आहे या व्हिडीओमध्ये? 

दोन अस्वल रस्त्याच्या किनाऱ्यावर भांडताना दिसत आहेत. हळूहळू ते रस्त्याच्या मधोमध येऊन भांडण्यास सुरुवात करतात. दोघांची भांडणं पुढे जाऊन फार भयानक रूप घेतात आणि पुन्हा एकमेकांना धक्के देत ते रस्त्त्याच्या किनाऱ्यावर जातात. अशातच एक लांडगा त्यांना लांबूनच पाहतो आणि दूरूनच पळ काढतो. 

Web Title: Rare video two bear fight on middle of road watch viral video