Shocking Video: अजगराची झाडावर चढण्याची स्टाइल बघूनच उडेल थरकाप, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 17:36 IST2022-05-07T17:35:38+5:302022-05-07T17:36:51+5:30
Python Viral Video : या व्हिडीओत एक अजगर फारच खतरनाक अंदाजात झाडावर चढताना दिसत आहे. अजगराला झाडावर चढताना पाहून तुमचा थरकाप उडू शकतो.

Shocking Video: अजगराची झाडावर चढण्याची स्टाइल बघूनच उडेल थरकाप, व्हिडीओ व्हायरल
Python Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच खतरनाक प्राण्यांचे आणि जीवांचे एकापेक्षा एक भारी व्हिडीओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे तर काही हैराण करणारे असतात. सापांचे लाखो व्हिडीओ सोशल मीडियावर बघायला मिळतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत एक अजगर फारच खतरनाक अंदाजात झाडावर चढताना दिसत आहे. अजगराला झाडावर चढताना पाहून तुमचा थरकाप उडू शकतो.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही तासांमध्ये याला शेकडो लाइक्स मिळाले आहेत. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, जंगलात एका झाडावर अजगर बसला आहे. यानंतर तो फुल स्पीडमध्ये सरकत झाडावर चढू लागतो. तुम्ही अजगराला झाडाच्या शेंड्यावर जाताना बघू शकता. हा नजारा खरंच हैराण करणारा आहे. कारण अजगर अशाप्रकारे झाडावर चढताना फारसं कुणी बघत नाही झाडावर चढण्याचा त्याचा अंदाजच वेगळा आहे.
हा व्हिडीओ snake._.world नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अजगर सर्वातआधी झाडाजवळ येतो आणि आपल्या शरीराचा काही भाग झाडावर घेतो. त्यानंतर बाकी शरीराच्या भागाने तो झाडाच्या चारही बाजूने वेढा देतो. असाच तो पुढे वर जातो. या स्टाइलने इतका जड अजगर काही वेळातच सरळ झाडावर चढतो. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.