तरुणाने हेल्मेट घातले पल्सर बाईक घेऊन नदीत उतरला, एक्सलेटर दाबला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:17 IST2023-04-08T16:17:09+5:302023-04-08T16:17:45+5:30

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

pulsar bike in river boy showed skill of driving while broken bridge in viral video | तरुणाने हेल्मेट घातले पल्सर बाईक घेऊन नदीत उतरला, एक्सलेटर दाबला अन्...

तरुणाने हेल्मेट घातले पल्सर बाईक घेऊन नदीत उतरला, एक्सलेटर दाबला अन्...

आपल्याकडे आजही अनेक ठिकाणी रस्त्याची मोठी अडचण आहे. अजुनही लोकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. सध्या अशाच एका समस्ये संदर्भात एका व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नदीत एक पुल तुटलेल्या अवसस्थेत दितस आहे. यातच एक तरुण आपली बाइक घेऊन नदीत उतरल्याचे दिसतंय.

Video : दिल्ली मेट्रोत हे काय सुरूये, बिकिनी गर्लनंतर आता कपलचा किसिंग व्हिडीओ व्हायरल

नुकताच एका युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओ व्हायरल झाला. एक तरुण हेल्मेट घालून पुलाजवळ पोहोचल्याचे दिसत आहे. नदीच्या काठावर हा पूल बांधण्यात आला होता, मात्र तो तुटलेला दिसत आहे. अनेकांना हा पूल ओलांडून जावे लागत आहे. 

काही वेळातच हा तरुण पल्सर दुचाकी घेऊन नदीत उतरतो आणि पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचतो. त्याने आपली बाईक नदीत उतरवली तेव्हा तो बुडेल अस वाटत. मात्र त्याने सुरक्षीत दुचाकी नदीच्या आत नेली आणि तो पलीकडे गेला.

हा व्हिडीओ आसाममधील आहे. तेथील एका नदीजवळ बांधलेल्या तुटलेल्या पुलामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडचण येत आहे. सध्या या व्हिडिओवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: pulsar bike in river boy showed skill of driving while broken bridge in viral video