'या' तरूणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, तेरे चेहरे में वो जादू है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 17:12 IST2019-04-12T17:11:32+5:302019-04-12T17:12:15+5:30

बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते अनेक तरूण-तरूणींच्या गळ्यातील ताईत असतात. कधी हे फॅन्स आपल्या लाडक्या अभिनेत्याची पूजा करतात, तर कधी त्याचा टॅटू आपल्या अंगावर काढतात.

The prince of dubai is so stylish and cool | 'या' तरूणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, तेरे चेहरे में वो जादू है...

'या' तरूणाचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, तेरे चेहरे में वो जादू है...

बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते अनेक तरूण-तरूणींच्या गळ्यातील ताईत असतात. कधी हे फॅन्स आपल्या लाडक्या अभिनेत्याची पूजा करतात, तर कधी त्याचा टॅटू आपल्या अंगावर काढतात. एवढचं नव्हे तर अनेक तरूणींना त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा असते. बॉलिवूडमधील विकी कौशल, कार्तिक आर्यन, सलमान खान यांसारख्या अभिनेत्यांना पाहून किंवा त्यांचे हटके आणि क्लासी लूक पाहून चटकन अनेक तरूणींच्या तोंडून 'How Cute', 'Hay mar java' किंवा मग 'Awww....' असे शब्द निघून जातात. पण यांच्या व्यतिरिक्त अनेक तरूण असे आहेत जे आपल्या लूक्सनी अभिनेत्यांनाही टक्कर देत असतात. अशाच एका तरूणाचे फोटो कदाचित तुम्ही अजून पाहिले नाहीत... आम्ही सांगत आहोत दुबईचा प्रिंस शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूमबद्दल... हो... नाव फारच मोठं आहे ना... पण तुम्ही त्याला प्रेमाने 'फैजा' असं म्हणू शकता. हे प्रिंसचं निक नेम आहे.

दुबईच्या शाही परिवरामध्ये जन्म घेणारा फैजा एखाद्या मॉडेल किवा अभिनेत्यापेक्षा कमी नाही.

एवढचं नाही तर, फैजाची इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया हॅन्डल्सवर फॉलोवर्सही अनेक आहेत. प्रिंस एवढा स्टायलिश आणि हॅन्डसम आहे की, अनेक मुली त्याच्या लूक्सवर घायाळ होतात. 

प्रिंन्सला फिरण्याची फार आवड आहे

फैजाने आपली शिक्षण दुबईमध्येच पूर्ण केलं आहे.

त्याने आपलं पुढील शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पूर्ण केलं आहे

प्रिन्सचं इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलतं तर तुमच्या लक्षात येईल की, त्याला घोडेस्वारी करण्याती फार आवड आहे. 

शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम, दुबईचे सध्याचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन राशिद अल मकतौम यांचा पुढिल उत्तराधिकारी आहे. 

Web Title: The prince of dubai is so stylish and cool