देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:32 IST2020-08-31T18:24:49+5:302020-08-31T18:32:56+5:30
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर एका म्हशीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. हा थरारक प्रकार उत्तरप्रदेशातील संभळ पोलिस स्थानकात घडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता भरधाव वेगानं बाईकवरून जात असलेल्या एका पोलिसाला म्हशीनं धडक दिली आहे. म्हशीनं हल्ला केल्यानंतर लगेच बाईकस्वार पोलीस जमिनीवर आदळला. तरिही म्हैस त्याची पाठ सोडत नव्हती. आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवून या पोलिसाला वाचवलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाईकस्वारावर ओढावलेला प्रसंग किती भयानक आणि जीवघेणा होता याबाबत तुम्हाला कल्पना येईल.
उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार याच म्हशीमुळे पोलिस स्थानकाबाहेरील अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. म्हशीनं हल्ला केल्यानंतर लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस त्याठिकाणी आला आणि त्यानं म्हशीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. रिपोर्टनुसार म्हशीला पळवून लावण्यासाठी अनेकांना काठ्या फेकून मारल्या. त्यानंतर म्हशीला पोलिस स्थानकाच्या परिसरातून पळवलं. जखमी पोलीसाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे पण वाचा-
वाह, मानलं गड्या! .... म्हणून त्यानं इंजिनिअरची नोकरी सोडून चहाची टपरी उघडली
मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा