Video : नेताजी कबूतरांच्या घाणीवर देत होते 'बोल बच्चन', अचानक वरून कबूतर गेलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 11:34 IST2019-09-18T11:31:10+5:302019-09-18T11:34:32+5:30

नेताजी एका चॅनेलला मुलाखत देत होते, तेव्हा अचानक....

Pigeon poops on lawmaker complaining about Chicago’s pigeon problems | Video : नेताजी कबूतरांच्या घाणीवर देत होते 'बोल बच्चन', अचानक वरून कबूतर गेलं आणि....

Video : नेताजी कबूतरांच्या घाणीवर देत होते 'बोल बच्चन', अचानक वरून कबूतर गेलं आणि....

अमेरिकेतील शिकागोमध्ये एका नेत्यासोबत एक अजब घटना घडली. नेताजी कबूतरांच्या विष्ठेच्या समस्येबाबत एका चॅनेलला मुलाखत देत होते. मजेदार बाब ही झाली की, मुलाखतीदरम्यान अचानक एक कबूतर त्यांच्या डोक्यावर आपलं काम करून गेला. ही घटना शिकागोतील ट्रान्झिट अथॉरिटी स्टॉपमधील आहे. या ठिकाणाला 'पीजन पूप स्टेशन' असंही म्हटलं जातं. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून लोक कबूतराला हिरो म्हणत आहे.

डेमोक्रॅटिक स्टेटचे प्रतिनिधी जॅमी एंड्राडे इरविंग पार्क ब्लू लाइन स्टेशनच्या बाहेर एका स्थानिक चॅनलला समस्येवर चर्चा करत होते. या चॅनलच्या रिपोर्टर @LaurenVictory यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडीओत मुलाखतीदरम्यान जॅमी डोक्यावर कबूतराने केलेला कारनामा साफ करताना दिसत आहे. ते म्हणाले की, 'मला वाटतं आताच त्यांनी माझ्यावर 'कारनामा' केलाय'. अर्थातच रिपोर्टरसाठी ही विचित्र स्थिती होती. पण ट्विटरवर लोक कबूतराला हिरो म्हणत आहेत.

Web Title: Pigeon poops on lawmaker complaining about Chicago’s pigeon problems