अंडे का फंडा : सोशल मीडियात अंड्यांची धूम; कायलीलाही टाकले मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 17:44 IST2019-01-20T17:44:07+5:302019-01-20T17:44:49+5:30

सोशल मीडियात कधी, काय व्हायरल होईल, याबाबत काही सांगता येणार नाही. सध्या कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे, ती म्हणजे अंड्यांची.

Photos of an egg becomes most popular Instagram post ever | अंडे का फंडा : सोशल मीडियात अंड्यांची धूम; कायलीलाही टाकले मागे!

अंडे का फंडा : सोशल मीडियात अंड्यांची धूम; कायलीलाही टाकले मागे!

मुंबई : सोशल मीडियात कधी, काय व्हायरल होईल, याबाबत काही सांगता येणार नाही. सध्या कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे, ती म्हणजे अंड्यांची. या दोन अंड्यांचे फोटो इतके व्हायरल झाले आहेत की, अमेरिकेतील अभिनेत्री आणि लोकप्रिय सेलिब्रिटी कायली जेनर हिलाही मागे टाकले आहे. 

इन्स्टाग्रामवरील ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’ अकाउंटवर या अंड्यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यामधील एका फोटोमधील अंडे संपूर्ण आकाराचा आहे. तर दुसऱ्या फोटोतील अंड्याला बारीक तडा गेला आहे. या अंड्याच्या दोन्ही फोटोंना अनेक नेटिझन्सनी लाईक केले असून अब्जावधीच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’ अकाउंटवर  8.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 

दरम्यान, अभिनेत्री कायली जेनर हिच्या सोशल मीडियातील 1.8 कोटींच्या विश्‍वविक्रमाला मागे टाकले आहे. यावर कायली जेनरने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती एक अंडे रस्त्यावर फोडत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Photos of an egg becomes most popular Instagram post ever