मॉडेलवर केली फोटोग्राफरने 'अशी' कमेंट, त्यावर तिनं जे केलं ते पाहुन तो झाला शर्मने लाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:42 IST2021-09-15T16:35:30+5:302021-09-15T16:42:34+5:30
एका फोटोग्राफरनं मॉडेलवर अशी काही कमेंट केली की तिला राग अनावर झाला. यानंतर तिनं फोटोग्राफरला चांगलीच अद्दल घडवली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मॉडेलवर केली फोटोग्राफरने 'अशी' कमेंट, त्यावर तिनं जे केलं ते पाहुन तो झाला शर्मने लाल
तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रात असला की तुम्हाला अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते ज्याचा सामान्य व्यक्ती विचारही करु शकत नाही. काहीवेळा मॉडेल्सना या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास होतो. एका फोटोग्राफरनं मॉडेलवर अशी काही कमेंट केली की तिला राग अनावर झाला. यानंतर तिनं फोटोग्राफरला चांगलीच अद्दल घडवली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बेल्जियम (Belgium) येथील २२ वर्षीय मॉडेल लिजे (Lize Dzjabrailova) हिनं नुकताच इनस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. लिजे हिला एका कपड्याच्या ब्रँडनं फोटोशूटसाठी अप्रोच केलं होतं. तिनं सांगितलं, की कंपनीला तिच्या साईजबाबत माहिती होतं. लिजे या फोटोशूटसाठी खूप उत्साही होती. मात्र, जेव्हा ती फोटोशूट करण्यासाठी पोहोचली तेव्हा फोटोग्राफरनं तिच्या वजनावर टीका करत म्हटलं, की या फोटोशूटनंतर पुढचं फोटोशूट दोन आठवड्यांनंतर आहे. त्यामुळे तू दोन आठवडे काही खाल्लं नाहीस तर त्या फोटोशूटपर्यंत तुझं वजन कमी होईल आणि बॉडी शेपमध्ये येईल.
फोटोग्राफरचे हे शब्द ऐकून लिजेला राग अनावर झाला. तिनं या फोटोग्राफरला लगेचच सडेतोड उत्तर दिलं. लिजेनं म्हटलं, की जर त्यानं हेच एखाद्या अशा मॉडेलला म्हटलं असतं, जी आपल्या शरीराबाबत इन्सिक्यूर आहे, तर ती डिप्रेशनमध्ये गेली असती आणि तिनं खरंच जेवण सोडून दिलं असतं. त्यामुळे तिला ईटिंग डिसऑर्डर झालं असतं. लिजेच्या एका फ्रेंडनं या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि लिजेनं तो सोशल मीडियावर शेअर केला. तेव्हापासूनच हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेनंतर कंपनीनं तिला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तिनं काहीही ऐकलं नाही. यानंतर कंपनीनं या फोटोग्राफरलाच नोकरीवरुन काढून टाकलं. सोशल मीडियावर अनेकजण लिजेला सपोर्ट करताना दिसत आहेत.