एका दुसऱ्याच विश्वाचं दर्शन घडवतात व्हेलच्या डोळ्याचे हे फोटो, बघाल तर बघतच रहाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:16 IST2024-11-13T15:08:27+5:302024-11-13T15:16:47+5:30
Humpback Whale Eye: Moore ने हंपबॅक व्हेलच्या डोळ्यांचे इतक्या जवळून फोटो काढले जे बघून लोक थक्क झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.

एका दुसऱ्याच विश्वाचं दर्शन घडवतात व्हेलच्या डोळ्याचे हे फोटो, बघाल तर बघतच रहाल!
Close-Up Shot Of A Humpback Whale Eye: तुम्ही समुद्रातील विशाल व्हेलचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतीलच. पण कधी तुम्ही त्यांचे डोळे जवळून पाहिले नसतील. प्रसिद्ध फोटोग्राफर Rachel Moore ने नुकतेच व्हेलच्या डोळ्याचे अद्भूत फोटो क्लिक केले आहेत. Moore ने हंपबॅक व्हेलच्या डोळ्यांचे इतक्या जवळून फोटो काढले जे बघून लोक थक्क झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहेत.
हंपबॅक व्हेलच्या डोळ्यांना इतक्या जवळून बघणं हा एक अनोखा अनुभव आहे. Rachel Moore ने हे फोटो प्रशांत महासागरात व्हेल वॉचिंग दरम्यान काढले होते. Moore ने आपली कला आणि टेक्निकच्या माध्यमातून हे फोटो जिवंत केले आहेत. हे फोटो बघताना प्रत्यक्ष व्हेलच्या डोळ्यात बघत असल्याचा अनुभव येतो.
Rachel Moore चे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यावर लोक त्यांचं कौतुक करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. असं सांगण्यात येत आहे की, Moore ने 6 ऑक्टोबर 2024 ला ताहितीजवळ एका मादा हंपबॅक व्हेलच्या डोळ्यांचं सौंदर्य कॅमेरात कॅप्चर केलं होतं. फोटोग्राफर Rachel Moore ने यांनी हे अद्भुत फोटो त्यांचं अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडल @moore_rachel वर पोस्ट केले आहेत.