VIDEO : इथे विषारी सापाचं ज्यूस पितात लोक, जाणून घ्या कसं बनवलं जातं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 17:02 IST2024-04-26T17:00:39+5:302024-04-26T17:02:21+5:30

जर तुम्हाला कुणी सापांचं ज्यूस पिताना दिसले तर कसं वाटेल? या व्हिडीओत हेच दाखवण्यात आलं आहे.

People drink snake venom juice people video goes viral | VIDEO : इथे विषारी सापाचं ज्यूस पितात लोक, जाणून घ्या कसं बनवलं जातं!

VIDEO : इथे विषारी सापाचं ज्यूस पितात लोक, जाणून घ्या कसं बनवलं जातं!

सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात ज्या बघून विश्वासही बसत नाही आणि हैराण व्हायला होतं. लोक असं कसं करू शकतात असा प्रश्नही अनेकदा पडतो. असाच एक हैराण करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सापाचं नाव जरी निघालं तरी अनेकांना घाम फुटतो. जर साप समोर आला तर काय होत असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अशात जर तुम्हाला कुणी सापांचं ज्यूस पिताना दिसले तर कसं वाटेल? या व्हिडीओत हेच दाखवण्यात आलं आहे. यात असं काही दाखवण्यात आलं आहे जे कमजोर हृदयाचे लोक बघू शकणार नाहीत.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका मोठ्या भांड्यात व्यक्तीने एक विषारी साप ठेवला आहे. त्याचं डोकं वर काढून तो दाखवत आहे. सापाला बघून असं वाटत आहे की, तो खूप दिवसाआधी मरण पावला आहे आणि त्याला ज्यूसमध्ये टाकून ठेवण्यात आलं आहे. यातील ज्यूस बघून भीती वाटू शकते, पण हे ज्यूस लोक पितात.

इंस्टाग्रामवरर sabado.pasado नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, हे पेय एक स्नेक वाइन आहे. जे तांदूळ आणि मृत कोब्रा टाकून तयार केलं जातं. वाइनसोबत मिक्स केल्यावर याचं विष नष्ट होतं आणि सापातील प्रोटीन ज्यूसमध्ये मिक्स होतं. व्हिएतनाममध्ये हा ज्यूस लोक आवडीने पितात.

Web Title: People drink snake venom juice people video goes viral